Home Bollywood Bollywood | शाहिद कपूर साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका?

Bollywood | शाहिद कपूर साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका?

642

मुंबई ब्युरो : शाहिद कपूर हा बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो. रोमँटिक चॉकलेट बॉय ते अक्शन हिरो अशा विविध प्रकारच्या भूमिका त्यानं आजवर साकारल्या आहेत. आता शाहिद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सध्या या आमामी चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु आहे. येत्या काळात या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली जाईल.

शाहिद सध्या कबीर सिंग या चित्रपटाच्या टीमशी या विषयावर चर्चा करत आहे. निर्माता रविंद्र वर्मा सध्या या विषयावर संशोधन करत आहेत. शिवाय ल्युसी प्रोडक्शन ही निर्मिती संस्था या चित्रपटावर कोट्यवधींची गुंतवणूक करायला देखील तयार आहे. येत्या काळात या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली जाईल असे संकेत शाहिद कपूरनं दिले आहेत.

400 वर्षांपूर्वी मराठ्यांनी गाजवलेल्या पराक्रमावर सध्या अनेक चित्रपट तयार केले जात आहेत. अलिकडेच प्रदर्शित झालेला ‘तान्हाजी’ या सुपरहिट चित्रपटानं तर कमाईचे सर्व विक्रम मोडून टाकले. तसंच येत्या काळात रितेश देशमुखं देखील शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या पार्श्वभूमीवर शाहिद कपूर महाराजांच्या भूमिकेला न्याय देऊ शकेल का? हे नक्कीच पाहण्याजोगं ठरेल.