नागपूर : मूळचे नागपूरचे असलेले नाट्यकलावंत केशव गणेश जोशी यांचे आज पुणे येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 84 वर्षे होते.त्यांचे पश्चात पत्नी अनुराधा,मलगा नितीन,विवाहित कन्या सुनिला तसेच सून,जावई,नातवंडे व मोठा आप्तपरिवार आहे.
केशवराव यांनी विदर्भ साहित्य संघाचे कोषाध्यक्षपद भूषविले होते. युगवाणी मध्ये प्रसिद्ध झालेल्या 25 वर्षातील साहित्याची सूची त्यांनी तयार केली.युगवाणीचे संपादनही केले. विसासंघाच्या ग्रंथालयाची पुनर्रचना केली.केशवराव हे नाटक व संगीताचे मर्मज्ञ रसिक होते.
ज्ञानेश्वरी,संत तुकोबारायांची गाथा,दासबोध हे महाग्रंथ त्यांनी आपल्या हस्ताक्षरात लिहून काढले होते .ते आज विसासंघाच्या ग्रंथालयात आहेत. श्रेष्ठ कवी ग्रेसची व त्यांची जवळची मैत्री होती. ग्रेसच्या काही कविताही त्यांनी आपल्या हस्ताक्षरात लिहिल्या होत्या.
ग्रेससंबंधी वृत्तपत्रात आलेल्या बातम्या व लेख यांच्या कात्रणांचा त्यांनी संग्रह केला होता. त्यांच्या पत्नी अनुराधा जोशी या एक उत्तम अभिनेत्री आहेत.
पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार पार पडला.