Home Maharashtra Maharashtra । कोरोना विरोधात मास्क हिच आपली ढाल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Maharashtra । कोरोना विरोधात मास्क हिच आपली ढाल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई ब्युरो : राज्यात आतापर्यंत 9 लाख लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. माझं कोविड योद्ध्यांना आवाहन आहे की त्यांनी लवकरात लवकर लस टोचून घ्यावी. आता बाकीच्यांना प्रश्न पडला असेल की आम्हाला लस कधी मिळणार? यावर मी म्हणेण की ते वरच्याच्या हातात आहे. म्हणजे केंद्राच्या निर्णयावर आहे. दरम्यान, कोरोना विरोधात आपला मास्क हेच आपलं मुख्य शस्त्र असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.

घरामध्ये बंद करुन ठेवणं कुणालाही आवडणार नाही. पुढील महिन्यात कोरोनाचा देशात शिरकाव होऊन वर्ष पूर्ण होईल. या वर्षभराच्या काळात तुम्ही खूप चांगली साथ दिली. अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. यात दिलासादायक गोष्ट म्हणजे आता कोरोना संसर्गावर लस उपलब्ध झाली आहे. माझी कोरोना योद्ध्यांना विनंती आहे की तुम्ही लवकर लसीकरण करुन घ्या. आता बाकीच्यांना प्रश्न पडला असेल की आम्हाला लस कधी मिळणार? यावर मी म्हणेण की ते वरच्याच्या हातात आहे. म्हणजे केंद्राच्या निर्णयावर आहे. आणखी एक-दोन कंपन्या लस उपलब्ध करुन देणार आहे.

राज्यातील कोरोना वाढतोय

राज्यामध्ये या आठवड्यापासून कमी होत असलेला कोरोनाचा आकडा पुन्हा वाढताना दिसत आहे. काल, शनिवारी राज्यात 6281 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 2567 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत एकूण १९,९२,५३० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.16 % एवढे झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here