Home मराठी Nagpur । महा मेट्रो नागपूर आज साजरा करीत आहे सहावा स्थापना दिन

Nagpur । महा मेट्रो नागपूर आज साजरा करीत आहे सहावा स्थापना दिन

688

ऑरेंज आणि अँक्वा लाईनवर प्रवासी सेवा सुरु
• डिसेंबर २०२१ पर्यंत कामठी आणि सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्याचा मानस
• नागपूरकरांच्या सहकार्यामुळे कार्य जलद गतीने होण्यास मदत


नागपूर ब्युरो : २१ ऑगस्ट २०१४ रोजी नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे भूमिपूजन व २०१५ पासून नागपूर शहरात मेट्रो रेल प्रकल्पाच्या निर्माण कार्याला सुरुवात झाली. २०१५ ते २०२१ – हा सहा वर्षाचा प्रवास महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पासाठी यशाचे अनेक शिखर गाठणारे ठरले, या वर्षात नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या दोन मार्गिका ऑरेंज आणि अँक्वा लाईनचे उदघाटन झाले आणि नागपूर मेट्रोची प्रवासी सेवा सुरु करण्यात आली.

डिसेंबर २०२१ सेंट्रल एव्हेन्यू,(रिच -४) आणि कामठी मार्गावर (रिच – २) प्रवासी सेवा सुरु करण्याचा महा मेट्रोचा मानस आहे. सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन आणि सिताबर्डी ते लोकमान्य नगर मार्गिकेवर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत नवीन कीर्तिमान स्थापित करीत आहे. नागपूर मेट्रोच्या कार्याचा गौरव इतर राज्यातील शहरांमध्ये देखील होत आहे. या व्यतिरिक्त नुकतेच केंद्र सरकारने सादर केलेल्या बजेट मध्ये नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज – २ चा समावेश केला आहे. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचा फेज – २ हा ४३.८ कि.मी लांबीचा असून यामध्ये ३२ मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. उल्लेखनीय आहे कि, नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज २ करता तसेच नाशिक मेट्रो रेल प्रकल्पाकरता भरीव तरतूद केली आहे.

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे निर्माण कार्य करतांना नागरिकांच्या सहकार्यामुळे कार्य जलद गतीने होण्यास मदत झाली. नागपूर मेट्रो ही निश्चितच नागपूरकरांची मेट्रो अशी माझी मेट्रो आहे.

• २१ ऑगस्ट २०१४ रोजी नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या हस्ते भूमिपूजन

२०१५ ते २०२० वर्षात घडलेल्या घडामोडीवर एक नजर :

• १८ फेब्रुवारी २०१५: नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाची स्थापना
• २१ मार्च २०१५ : नागपूर मेट्रो प्रकल्पाची वेबसाईट आणि लोगोचे अनावरण
• ३१ मे २०१५: नागपूर मेट्रोच्या कार्याची (कार्यारंभ) सुरुवात.
• १० एप्रिल २०१५ : केएफडब्ल्यू आणि नागपूर मेट्रो दरम्यान ५०० मिलियन युरो करीता ऋण करार.
• १७ नोव्हेंबर २०१५ : एएफडी फ्रांस आणि नागपूर मेट्रो दरम्यान १३० मिलियन युरो करीता ऋण करार
• २३ जानेवारी २०१७ : नागपूर मेट्रोचे महा मेट्रो मध्ये रुपांतर
• ४ एप्रिल २०१७ : राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त मेट्रो कर्मचाऱ्यांची मानवी साखळीचे लिमका बुक आणि इंडिया बुक मध्ये नोंदणी
• २ ऑगस्ट २०१७ : पहिल्या ३ मेट्रो कोच नागपूर शहरात दाखल
• ३० सपटेबर २०१७ : नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ट्रायल रनला सुरुवात आणि महा कार्ड लौंच
• २१ एप्रिल २०१८ : एयरपोर्ट साउथ ते खापरी दरम्यान जॉय राईड सुरु
• ४ मे २०१८ : सिव्हील लाईन येथे माहिती केंद्राचे उद्घाटन
• १६ जुलै २०१८ : महा मेट्रो,भारत सरकार आणि राज्य सरकार दरम्यान ब्रॉडगेज मेट्रो करीता सामंजस्य करार
• २ नोव्हेंबर २०१८ : ३ दिवसीय अर्बन मोबिलीटी इंडिया कॉन्फ्रेस चे नागपूर येथे आयोजन
• २२ नोव्हेंबर २०१८ : चीन येथील सीआरआरसी डालीयन प्लांट येथून मेट्रो ट्रेन रवाना
• ८ जानेवारी २०१९ : नागपूर मेट्रोच्या रु.११२१६ कोटी खर्चाच्या फेज- २ मेट्रो प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी.
• १५ जानेवारी २०१९ : महा मेट्रो आणि नागपूर महानगरपालिका दरम्यानकॉटन मार्केट,संत्रा मार्केट,संत्रा मार्केट,गोल बाजार,नेताजी मार्केट विकास करीता सामंजस्य करार
• ७ मार्च २०१९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारे नागपूर मेट्रो ऑरेंज लाईन(खापरी से सीताबर्डी इंटरचेंज) चे लोकार्पण या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री श्री.नितिन गडकरी आणि इतर मंत्री गण प्रामुख्याने उपस्थित होते.
• ८ मार्च २०१९ : खापरी ते सिताबर्डी इंटरचेंज दरम्यान आभार राईडचे आयोजन
• ३१ मे २०१९ : अँक्वा लाईनच्या लोकमान्य नगर ते सुभाष नगर दरम्यान पहली ट्रायल रन संपन्न
• ५ जुलै : नागपूर मेट्रोच्या फेसबुकला ५ लाख लाईक मिळाले
• १६ जुलै : भारतामध्ये जर्मनीचे राष्ट्रदूत वॉल्टर लिंडन आणि केएफडब्ल्यूच्या प्रतिनिधी मंडळाने नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाला भेट दिली.
• १५ ऑगस्ट २०१९ : महा मेट्रो येथे स्वतंत्रता दिवस संपन्न आणि सुभाष नगर से सिताबर्डी इंटरचेंज दरम्यान पहिल्यांदा ट्रायल रन
• ३१ ऑगस्ट २०१९ : प्रवाश्यांकरिता महा कार्ड आणि अँपचे अनावरण
• ४ नोव्हेंबर २०१९ : रिच -४ (सिताबर्डी ते प्रजापती नगर) व्हायाडव्टच्या शेवटचे सेग्मेंट कास्ट करण्यात आले
• ५ नोव्हेंबर २०१९ : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (एनएचएआय), कामठी मार्ग (आटोमोटिव्ह चौक ते एलआयसी चौक) डबल डेकर उड्डाणपूलाला मंजुरी .
• २० नोव्हेंबर २०१९ : ऑरेंज लाईन मार्गावरील जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन प्रवाश्यांनकरिता सुरु
• २७ नोव्हेंबर २०१९ : खापरी से सिताबर्डी दरम्यान १५ मिनिटांतनी ८० कि.मी. कि गतीने प्रवासी सेवा सुरु
• ९ डिसेंबर २०१९ : तेलगांना सरकार ने वारांगल शहराकरिता मेट्रो नियो डीपीआरचे कार्य महा मेट्रोला सौपविले
• २८ जानेवारी २०२० : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे द्वारे नागपूर मेट्रो अँक्वा लाईन (सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर) चे लोकार्पण या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हरदीप सिंह पुरी आणि इतर मंत्री गण प्रामुख्याने उपस्थित होते.
• २६ फेब्रुवारी २०२० : गड्डीगोदाम येथे महा मेट्रोच्या मल्टी लेयर ट्रान्सपोर्ट सिस्टमच्या निर्माण कार्याला सुरुवात
• १४ मार्च २०२० : केंद्र शासनाच्या उर्जा मंत्रालय अंतर्गत जड उद्योग विभागाने,उर्जा दक्षता सेवा लिमिटेड(Energy Efficiency Service Limited) विभागाद्वारे महा मेट्रो परिसर येथे ईलेव्कट्रीकल वाहनांन करीता चार्गिंग स्टेशन बसविण्याकरीता परवानगी दिली.
• ०४ जून २०२० : : महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाला आयएसओ १४००१:२०१५ चे प्रमाणपत्र
• ०८ ऑक्टोबर २०२० : मेट्रो भवनला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलतर्फे सर्वोच्च `प्लॅटिनम’ दर्जा
• ०९ ऑक्टोबर २०२० : अजनी चौक,रहाटे कॉलोनी,एलएडी चौक आणि बंसी नगर मेट्रो स्टेशनला ‘सीएमआरएस’चे प्रमाणपत्र
• १४ ऑक्टोबर २०२० : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने महा मेट्रोच्या ब्रॉडगेज (बीजी) मेट्रो प्रस्तावाला मंजुरी दिली. रु. ३३३.६० कोटीचा हा प्रकल्प नागपूर – नरखेड, वर्धा, भंडारा आणि रामटेक या सभोवतालच्या सॅटेलाईट शहरांना हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यार आहे.
• १६ ऑक्टोबर २०२० : कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर नंतर मेट्रोची प्रवासी सुरु
• १६ ऑक्टोबर २०२० : :* कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ द इयर २०२०’”पुरस्कार महा मेट्रो व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीक्षित यांना प्रदान
• १३ नोव्हेंबर २०२० : वर्धा मार्गवरील डबल डेकर उडडाणपूलाचे उद्घाटन, सदर कार्यक्रमास केंद्रीय मंत्री, रस्ते परिवहन व महामार्ग, आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास, भारत सरकार, राज्याचे गृह मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रामुख्याने उपस्थित होते.
• ०७ डिसेंबर २०२० : शंकर नगर आणि रचना रिंग रोड जंक्शन मेट्रो स्टेशन येथून ‘सीएमआरएस’चे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर प्रवासी सेवा सुरु
• २७ डिसेंबर २०२० : मेट्रो प्रवाश्याची रेकॉर्ड रायडरशीप,२२१२३ हजार नागरिकांनी केला मेट्रो ने प्रवास
• २६ जानेवारी २०२१ : जुने सर्व रेकॉर्ड मोडत तब्ब्ल ५६,४०६ नागरिकांनी केला मेट्रोने प्रवास
• *०९ फेब्रुवारी २०२१ : फ्रान्स राजदूत हिज एक्सेलंसी इमॅन्युएल लेना आणि इतर अधिकाऱ्यांची नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाला भेट.

Previous articleNagpur । मनपा उपद्रव शोध पथकांनी केली ९० मंगल कार्यालयाची तपासणी
Next articleIPL 2021 Auction | आज दांव पर लगेगी 291 खिलाड़ियों की किस्मत
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).