Home Maharashtra फैजान मिर्ज़ा । भाजप वाल्यांना जयंत पाटलांच्या वाटी न जाण्याचा सल्ला

फैजान मिर्ज़ा । भाजप वाल्यांना जयंत पाटलांच्या वाटी न जाण्याचा सल्ला

नागपूर ब्यूरो : राष्ट्रवादी युवक कांग्रेस, महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी फैजान मिर्ज़ा म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची आज महाराष्ट्रात लोकप्रियता पाहून आणि यांना महाराष्ट्रात मिळालेला प्रतिसाद पाहून भाजपला गळती लागायची सुरुवात झालेली आहे। म्हणून भाजपचे नेते अतिशय खालच्या पातळीवर जाऊन जयंत पाटील यांच्या वर टीका करत आहेत।

जयंत पाटील अशा प्रकारच्या टीके वर फार लक्ष देत नसतात कारण जयंत पाटील सध्या महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांचा विकास करण्यात व्यस्त आहेत। आणि भाजपचे नेते मंडळी सत्तेत येण्याची स्वप्न बघता-बघता थकायला झालेत, म्हणून ते अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत। भाजपच्या नेत्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी वेळ आल्यावर त्याचे उत्तर जयंत पाटील स्टाईल मध्ये देणे सुद्धा रायुकां पदाधिकार्यांना बऱ्यापैकी कळते।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here