Home Health गडचिरोली जिल्हा रुग्णालयाचं नवं रूप पाहून आयएएस अधिकारी करू लागले कौतुक

गडचिरोली जिल्हा रुग्णालयाचं नवं रूप पाहून आयएएस अधिकारी करू लागले कौतुक

728

तुकाराम मुंढे यांनी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

गडचिरोलीचं जिल्हा सामान्य रुग्णालय संपूर्ण महाराष्ट्रात याक्षणी चर्चेचा विषय बनलं आहे. याचं कारण ही तितकच वेगळं आहे. आता तर जिल्हा रूग्णालयाच्या या नव्या रूपाचे कौतुक खुद आयएएस अधिकारी ही करू लागले आहेत.

 

गडचिरोली ब्युरो : गडचिरोली जिल्हा तसा फारच दुर्गम जिल्हा. इथे अनेक वर्ष अनेक विकासकामं रखडलेल्या अवस्थेत. अनेक वेळा तिथल्या रुग्णांना दवाखान्यात जायचं म्हटलं तर जंगलातून काट्या-कुट्यातून वाट काढत जावे लागते. मात्र आता याच गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा व कौतुकाचा विषय बनलं आहे. याच रुग्णालयाचं आणि ज्यांनी हे रुग्णालय उभारण्यात मोलाची भूमिका बजावली त्या जिल्हाधिकाºयांचं आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी कौतुक केलं आहे. ‘हेच खरे यश’ म्हणून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.

तुकाराम मुंढे यांचं ट्विट

हे गडचिरोलीचं जिल्हा रुग्णालय आहे यावर विश्वास ठेवा. अतिशय प्रेरणादायी आणि ग्रेट वर्क, असं ट्विट करत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचं अभिनंदन करत तुकाराम मुंढे यांनी त्यांची तारीफ केली आहे. हा खरा मोलाचा वाटाङ्घ हे खरं यशङ्घ हे यश सर्व क्षेत्रांत मिळवण्यासाठी सर्वच स्तरांवर सहका?्यांच्या प्रयत्नांची पराकष्ठा आवश्यक आहे, असंही ट्विटमध्ये तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात शिरल्यावर एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये शिरल्याचा भास होतो. इतकं देखणं आणि सुसज्ज रुग्णालय गडचिरोलीमध्ये उभं राहिलंय. हे रुग्णालय उभं करण्यात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचं योगदान मोठं आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली टीमने या हॉस्पिटलसाठी जीवापाड मेहनत घेतली. अखेर काहीच दिवसांपूर्वीच गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रुग्णालयातील आयसीयू कक्षाचं उद्घाटन पार पडलं.

सुसज्ज आयसीयू

गडचिरोलीच्या आयसीयूमध्ये 12 फुल्ल अ‍ॅटोमॅटिक बेड आहेत. या कक्षात व्हेंटिलेटरवर, सेंटर मॉनिटर, बेडसाईज मॉनिटर, सेंटर सक्सेम, टेली आसीयू मशीनही लावण्यात आली आहे. या सुविधेने गडचिरोलीतून थेट दिल्ली किंवा इतर कुठेही उपचारादरम्यान तज्ञ्जांचा सल्ला घेता येणार आहे.

या आईसीयूमध्ये मॉड्यूलर आॅपरेशन थेटर, लेबर रूम आणि ओटी, स्वतंत्र वैद्यकीय अधीक्षक कक्ष स्टाफ रुमची व्यवस्था करण्यात आली आहे. इथे 5 फिजिशियन डॉक्टर तर 12 स्टाफ नर्सची टीम असणार आहे. या अत्याधुनिक आयसीयूला लक्स कार्यक्रमांतर्गत नॅशनल सर्टीफाईड देखील देण्यात आलं आहे. हा अत्याधुनिक कक्ष केवळ आठ महिन्यात उभा केला गेला आहे, ये विशेष.