Home National केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवड्यात 3 दिवस सुट्टी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन

केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवड्यात 3 दिवस सुट्टी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन

602

नवी दिल्ली ब्युरो : मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन दिवसांची साप्ताहिक सुटी देण्याच्या पर्यायाची चाचपणी केंद्र सरकारकडून सुरू आहे. यासंदर्भात लवकरच अधिसूचना जारी होऊ शकते. जर 3 दिवस सुटीचा पर्याय स्वीकारला तर संबंधित संस्था कर्मचाऱ्यांना चार दिवस 12 तास काम करणं बंधनकारक असू शकते.

श्रम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जर कर्मचाऱ्यांनी 3 दिवस सुटीचा पर्याय स्वीकारला तर आठवड्यातून चार दिवस 12 तास काम करणे बंधनकारक असणार आहे. परंतु या पर्यायाचा वापर करण्यासाठी कंपनी आणि कर्मचाऱ्यांची सहमती आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांनी सहमती दिली तरच हा पर्याय वापरता येईल.

नवीन चार कामगार कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडून चाचपणी सुरू आहे. यासाठी सरकारने अनेक औद्योगिक संघटनांकडून यावर पर्याय सूचविण्यास सांगितले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंतिम निर्णय घेताना सरकराने या पर्यांयाचा विचार केला आहे.