Home आत्मनिर्भर आत्मनिर्भर | आईच्या हातची खीर विकून पुण्यातले बहिण-भाऊ बनले कोट्यधीश

आत्मनिर्भर | आईच्या हातची खीर विकून पुण्यातले बहिण-भाऊ बनले कोट्यधीश

580

पुणे ब्युरो : भारतीय खाद्यसंस्कृतीत खिरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशभरात विविध पदार्थांची खीर बनवली जाते आणि आवडीने खाल्लीही जाते. मग जर ती खीर आईच्या हातची असेल तर स्वर्गसुख. पुण्यातील भाऊ-बहिण आईच्या हातची खीर विकून चक्क कोट्यधीश बनले आहेत. ‘La Kheer Deli’ (LKD) नावाच्या आऊटलेटमधील खीर देशभरात लोकप्रिय होत आहे. या आऊटलेटमध्ये न्यूटेला, ब्राऊनी, चॉकलेट, ओरिओ आणि गुलकंद अशा फ्लेवर्समध्ये खीर मिळते.

भाऊ-बहिणीने मिळून सुरु केला व्यवसाय

शिवांग आणि शिविका सूद असं या भाऊ-बहिणीचं नाव आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये या आऊटलेटची सुरुवात केली आहे. त्यांच्या आऊटलेटमधील खीर ही फक्त पुण्यातच नाही तर भारताच्या अनेक शहरांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. 27 वर्षीय शिवांग सूद म्हणाला की, आम्ही दोघे लहान असताना आई खीर बनवायची. आईच्या हातची खीर संपूर्ण कुटुंब मोठ्या प्रेमाने आणि आवडीने खात असेल. काही वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 मध्ये माझी बहिण या खिरीला कंटाळली. मग तिने आपल्या खिरीमध्ये चमचाभर न्यूटेला आणि ओरिओ टाकलं. यामुळे खिरीची चव बदलली.

मग काय तिने आपल्या आईला या चवीबद्दल सांगितलं. यानंतर आईने गुलकंद आणि ब्राऊनी घालून खीर बनवली. कुटुंबीयांना ती चवही आवडली. इतकंच नाही तर त्यांनी ही खीर नातेवाईकांनाही चाखायला दिली. शेजारीपाजारीही खीर खाल्ल्यावर तृप्त झाले. शिवांग सांगतो की, सुरुवातीला मी स्पोर्ट्स स्टार्टअप चालवायचो. मग ही खीर इतरांपर्यंत पोहोचवण्याची कल्पना माझ्या आणि शिविकाच्या डोक्यात आली. परंतु अडचण गुंतवणुकीची होती. पैसा कुठून येणार. यानंतर 19 मे, 2017 रोजी अखेरीस आम्ही गुंतवणूक केलीच. पुण्याच्या औंधमध्ये ‘स्टारबक्स’च्या बाहेर गाड्यावर आईने बनवलेली खीर बनवण्यास सुरुवात केली. यामध्ये विविध फ्लेवर्स होते.

हळूहळू व्यवसाय वाढला

पहिल्या दिवशी मित्रांच्या मदतीने खिरीचे 44 डब्बे विकले. पुढच्या दिवशी आईने 82 डब्बे बनवले. तिसऱ्या दिवशी 100 डब्बे बनवले आणि सगळ्यांची विक्री झाली. मार्केटिंग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रॅण्डिंगची सुरुवात केली. लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यांनी प्री-ऑर्डर देण्यास सुरुवात केली, असं शिवांगने सांगितलं. यानंतर सूद कुटुंबाने 2018 मध्ये पुण्याच्या जेएम रोडवर दुकान सुरु केलं. पहिल्या वर्षातील कमाई 33 लाख रुपये होती. 2018 मध्ये वाढून ती 84 लाख रुपयांपर्यंत पोहोचली. तर 2019 आणि 2020 मध्ये एक कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.

आईने आपली नोकरी सोडली

बहिण-भावाच्या जोडीने हा व्यवसाय सुरु केला असला तरी सर्वाधिक मेहनत त्यांच्या आईने केली आहे. 52 वर्षीय सोनिया सूद या शाळेत शिक्षिका होत्या. परंतु मुलांना मदत करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. पुण्यातील ‘La Kheer Deli’ आऊटलेट आज फारच लोकप्रिय आहे. शिवाय व्यवसायही चांगला सुरु आहे. त्यामुळे त्यांना नोकरी सोडल्याची खंत नाही.

Previous articleAero India 2021 | आ रहा है आत्मनिर्भर भारत का डिफेंडर और डिस्ट्रॉयर
Next articleCinema । पूजा हेगडेकडे चाहत्याने मागितला न्यूड फोटो, पूजाचा हटके रिप्लाय
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).