Home Maharashtra भारतीय मराठा महासंघ। जिल्हाध्यक्ष पदी मोहन शिंदे, महिला अध्यक्षपदी आशाताई बच्छाव

भारतीय मराठा महासंघ। जिल्हाध्यक्ष पदी मोहन शिंदे, महिला अध्यक्षपदी आशाताई बच्छाव

835

कोल्हापूर ब्यूरो : पेठ वडगांव ता.हातकणंगले येथील मोहन शिंदे यांची भारतीय मराठा महासंघाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी व श्रीमती आशाताई बच्छाव यांची नाशिक जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिवशी
ठाणे येथील मुख्य कार्यालयात
भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाँ. आप्पासाहेब आहेर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बन्सी (दादा) डोके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यावेळी युवा मराठा न्यूज चँनेलचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत , व्यवस्थापकीय संपादक श्रीमती आशाताई बच्छाव , महाराष्ट्र प्रतिनिधी विजय पवार , ठाणे जिल्हा विभागीय संपादक वैभव पाटील , दिलीप चव्हाण नाशिक , अरुण कुंभार रायगड, बालाजी पाटील नांदेड, राजेश कदम बीड, सिध्दांत चौधरी पुणे, दावल पगारे, जगदिश बधान, जयवंत धांडे सटाणा, बबनराव तिरमळे सरपंच शहापूर, कुसूम चंद्रमोरे कल्याण, पार्थ पवार मुंबई , विशाल बच्छाव, दिपक भावसार, आंशूराज पाटील राऊत मालेगांव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी युवा मराठा न्युज चँनलच्या महाराष्ट्र कार्यालयाचे शानदार उदघाटन उत्साही वातावरणात पार पडले.