Home मराठी झिरो माईल व कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनची गती वाढवा : डॉ. ब्रिजेश...

झिरो माईल व कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनची गती वाढवा : डॉ. ब्रिजेश दिक्षित

667

नागपूर ब्यूरो : दिवसेंदिवस ऑरेंज आणि ऍक्वा लाईन मार्गिकेवर रायडरशिप वाढत असून २६ जानेवारी रोजी तब्बल ५६४०६ नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला तसेच या वर्षाच्या अखेर रिच – २ आणि रिच – ४ मार्गिका सुरु करण्याचा महा मेट्रोचा मानस आहे. महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पातर्गत रिच – २ व रिच – ४ येथील निर्माण कार्य गतीने सुरु आहे. याच अनुषंगाने महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दिक्षित यांनी झिरो माईल व कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान डॉ. दीक्षित यांनी निर्माणाधीन कार्याचा आढावा अधिकाऱ्याकडून घेत योग्य ती खबरदारी घेत कार्य जलद गतीने लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

महा मेट्रोने सप्टेंबर महिन्यात अजनी चौक, रहाटे कॉलोनी, एलएडी चौक आणि बंसी नगर मेट्रो स्टेशन नागरिकांच्या सेवेत दाखल व डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सुभाष नगर आणि रचना रिंग रोड जंक्शन मेट्रो स्टेशन देखील प्रवाश्यानकरिता अनलॉक करण्यात आले.

सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटिव्ह चौक
रिच – २ ( सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटिव्ह चौक) मार्गिकेवरील झिरो माईल (१४३४०) वर्ग मीटर क्षेत्रांमध्ये मेट्रो स्टेशनची उभारणी करण्यात येत असून स्टेशनच्या वरील मजल्यावरील निर्माण कार्य पीपीपी तत्वावर करण्यात येणार आहे. या संपूर्ण इमारतीमध्ये पार्किंगची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी एकावेळेस २३३ कार, ४६४ दुचाकी व ३६५ सायकल ठेवता येणार आहे तसेच या भव्य इमारतीच्या ४ थ्या मजल्यावरून ट्रेन जाणार आहे व तेथेच स्टेशन प्लॅटफॉर्म असणार आहे. सध्यास्थितीत या स्टेशनचे ९९% सिव्हिल कार्य पूर्ण झाले आहे उर्वरित कार्य गतीने सुरु आहे. या व्यतिरिक्त कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनचे निर्माण कार्य (५६७८.२८) वर्ग मीटर क्षेत्रांमध्ये या स्टेशनचे निर्माण कार्य सुरु आहे. या इमारतीमध्ये ४ लिफ्ट्स,४ एस्केलेटर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्टेशनच्या पहिल्या मजल्यावर कॉनकोर्स लेव्हल असणार आहे व दुसऱ्या मजल्यावर प्लॅटफॉर्मची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे मेट्रो स्टेशन आहेत सेवेत

सध्या ऑरेंज लाईन मार्गिकेवरील सिताबर्डी इंटरचेंज,रहाटे कॉलोनी, अजनी चौक, जयप्रकाश नगर, एयरपोर्ट मेट्रो स्टेशन, साउथ एयरपोर्ट मेट्रो स्टेशन, न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशन आणि खापरी मेट्रो स्टेशन तसेच ऍक्वा लाईन मार्गिकेवरील सिताबर्डी इंटरचेंज, झांसी राणी चौक, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स, शंकर नगर चौक, एलएडी चौक, सुभाष नगर, रचना रिंग रोड जंकशन, वासुदेव नगर, बंसी नगर, लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथून प्रवासी सेवा नागरिकांकरीता सुरु आहे.

यावेळी संचालक (प्रकल्प) महेश कुमार यांनी व्यवस्थापकीय संचालक यांना मेट्रो स्टेशनची सविस्तर माहिती प्रदान केली. यावेळी संचालक(रोलिंग स्टॉक) सुनील माथूर, कार्यकारी संचालक अनिल कोकाटे, अरुण कुमार, महादेवस्वामी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.