Home मराठी Nagpur | महापालिका निवडणूक हे मिशन ठेवा : प्रफुल पटेल

Nagpur | महापालिका निवडणूक हे मिशन ठेवा : प्रफुल पटेल

463
0

नागपूर ब्युरो : आगामी महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर पक्षाची ताकद दाखवा असा सल्ला खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले यांच्या नेतृत्वात खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या रामदासपेठ निवासस्थानी भेट घेऊन शिष्टमंडळाने चर्चा केली.

आगामी निवडणुकीत युतीचे संकेत असले तरी स्वबळावर निवडणुकीची व पक्ष संघटनेची तयारी आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आघाडी सरकारमध्ये सामान्यांचे प्रश्न सोडविण्याकरिता पुढाकार घेऊन पक्षाची गरिमा व विश्वास वाढवावा असे मत त्यांनी व्यक्त केले.

आगामी महानगरपालिका निवडणुकीत पक्ष संघटना वार्डनिहाय संघटना मजबूत करीत असून यंदा मनपा निवडणुकीत उत्तम प्रदर्शन दाखवू असा विश्वास दिलीप पनकुले यांना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिला. या प्रसंगी ना. अनिल देशमुख यांचा जनता दरबार हा नागपूरकरांना दिलासा देणारा असून आपल्या नागपूर दौऱ्याचेही शहरात व कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा व उत्साह वाढत असल्याचे खा. प्रफुल पटेल यांच्या निदर्शनात आणून दिले. या प्रसंगी शहर पदाधिकारी संजय शेवाळे, रवींद्र मुल्ला, बबलू चव्हाण, अनिरुद्ध मिश्रा, सोपानराव शिरसाट प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here