Home Health Bird Flu | धोनीनं पाळलेल्या “कड़कनाथ” कोंबड्यांनाही बसला फटका

Bird Flu | धोनीनं पाळलेल्या “कड़कनाथ” कोंबड्यांनाही बसला फटका

612

देशातील विविध भागांमध्ये पसरणाऱ्या बर्ड फ्लूचा फटका क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी यालाही बसला आहे. सक्रिय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू महेंद्र सिंह धोनी, यानं त्याच्या रांची येथील फार्महाऊसवर सेंद्रीय शेती, कुक्कुटपालन व्यवसायात उडी घेतली. एकिकडे त्याच्या शेतात पिकलेल्या भाज्यांना बाजारात चांगली मागणी आहे, तर दुसरीकडे मात्र बर्ड फ्लूच्या साथीनं त्याला फटका बसला आहे.

कडकनाथ कोंबड्यांचं पालन करत ट्रेंडमध्ये असणाऱ्या या कुक्टुट पालनाच्या व्यवसायात धोनीनं पाउल टाकलं. पण, आता मात्र यात त्याला नुकसान सोसावं लागण्याची चिन्हं आहेत. कारण झारखंडमध्ये असणाऱ्या धोनीच्या पोल्ट्री फार्ममधील 2500 कडकनाथ कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहेत. धोनीकडे असणाऱ्या काही कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू असल्याचं निष्पन्न झालं आहे. काही दिवसांपूर्वीच धोनीच्या पोल्ट्री फार्ममधील काही कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर येथील काही नमुने भोपाळमधील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. जिथं या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळं झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं.

कोरोनाकाळात अफवेचा बळी ठरलेला पोल्ट्री उद्योग पुन्हा एकदा अडचणीत आला आहे . बर्ड फ्लू रोगाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी चिकनची मागणी घटली आहे. त्यामुळं जिवंत कोंबडीच्या दरात 25 ते 30 रुपयांनी, तर किरकोळ विक्रीच्या दरात 40 ते 50 रुपयांनी घट झाली आहे. अंड्यांचे दरही नगामागे पन्नास पैसे ते एक रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील दररोज सत्तर कोटींचे नुकसान होत असल्याचा अंदाज पोल्ट्री उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. महिन्याभरात सुमारे दोन हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे

महाराष्ट्रात अलर्ट

राज्यातील शहरी व ग्रामीण भागात बर्ड फ्ल्यू आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने शहरी व गाव पातळीवर काम करणाऱ्या पशुसंवर्धन विभागाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. परभणी, लातूर, रायगड यांसारख्या भागांमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याचं कळत आहे. त्यामुळं कोठेही कोणतेही पक्षी मृतावस्थेत आढळल्यास त्याची माहिती प्रशासनाला तातडीनं देण्यात यावी, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

Previous articleप्रदेशाध्यक्षपदासाठी नाव चर्चेत असल्यानं पासपोर्ट प्रकरण उकरुन काढलं
Next articleCelebration | आज है लोहड़ी और कल है मकर संक्रांति का पर्व
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).