Home Health Bhandara Hospital Fire | मुख्यमंत्री ठाकरे यांचा भंडारा दौरा; हॉस्पिटलची पाहणी करणार

Bhandara Hospital Fire | मुख्यमंत्री ठाकरे यांचा भंडारा दौरा; हॉस्पिटलची पाहणी करणार

717

भंडारा ब्यूरो : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ( SNCU ) शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीमुळे 10 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्य सरकारने तातडीने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

या सर्व प्रकरण लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता भंडारा जिल्ह्यातील दूर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पहाणी करणार आहेत. तसेच नवजात बालकं गमावलेल्या पालकांचे सांत्वन करून त्यांना दिलासा देणार आहेत.

दुपारी 12 वाजता ते भंडारा जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पहाणी करणार आहेत. यानंतर ते नवजात बालकं गमावलेल्या पालकांचे सांत्वन करुन त्यांना दिलासा देतील.

मुख्यमंत्री करणार दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पहाणी
  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (10 जानेवारी) सकाळी 7.30 वाजता वर्षा बंगल्यावरुन भंडाराकडे रवाना होतील.
  2. 12.15 वा. नागपूर विमानतळ येथे आगमन
  3. 12.20 वा. हेलिकॅप्टरने शहापूर, ता.जि भंडाराकडे प्रयाण
  4. 12.55 वा जिल्हा सामान्य रूग्णालय दुर्घटनेतील भोजापूर येथील मृत शिशुचे पालकांची भेट
  5. 01.20 वा जिल्हा सामान्य रूग्णालय, भंडारा येथील वैद्यकीय शुश्रुषेत असलेल्या शिशुंच्या पालकांची भेट व घटनास्थळाचे निरीक्षण
  6. 02.30 वा विमानाने मुंबईकडे प्रयाण
दुर्घटनेसाठी जबाबदार असतील त्यांची चौकशी, कारवाई

या आगीतून अग्निशमन विभागाचे अधिकारी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी 7 बालकांना वाचविले आणि आग पसरू नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली म्हणून संपूर्ण रुग्णालय वाचले. या वाचलेल्या बालकांवर कोणतीही हयगय न होता व्यवस्थित उपचार सुरु ठेवा असेही निर्देश मी दिले आहेत, पण ही घटना मन सुन्न करणारी आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, कोवळ्या जीवांना मरण आले. कितीही सांत्वन केले तरी हे दु;ख भरून येणारे नाही. मी मुख्यमंत्री म्हणून या अतिशय दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या बालकांच्या पालकांच्या भावना समजू शकतो, त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राज्य शासन त्यांच्या या दु:खात सहभागी आहे. पण इतकेच करून चालणार नाही. या दुर्घटनेसाठी जे जबाबदार असतील त्यांची चौकशी करून तत्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यास मी गृहमंत्री आणि आरोग्य मंत्री दोघानांही सांगितले असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात.

 

Previous articleCovid-19 | 16 जनवरी से देश में लगने लगेगा टीका, पीएम की बैठक के बाद फैसला
Next articleठाकरे सरकारचा मोठा निर्णय | फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांतदादांच्या सुरक्षेत कपात
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).