Home मराठी Maharashtra । राज्यपाल भगत सिंह कोश्यारी नागपूर व चंद्रपूर दौऱ्यावर

Maharashtra । राज्यपाल भगत सिंह कोश्यारी नागपूर व चंद्रपूर दौऱ्यावर

नागपूर ब्युरो : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 12 ते 17 जानेवारी दरम्यान नागपूर – चंद्रपूर दौऱ्यावर आहेत. या कालावधीत जगप्रसिध्द ताडोबा अभयारण्य व कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाला भेट देणार आहेत.

मंगळवार, दिनांक 12 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता नागपूर विमानतळावर आगमन होईल. विमानतळावरुन साडेपाचला राजभवन येथे आगमन व रात्री मुक्काम. बुधवार, दिनांक 13 जानेवारी रोजी राजभवन येथून सकाळी 10 वाजता वरोरा(चंद्रपूर जिल्हा) कडे प्रयाण करतील. 13 ते 15 या कालावधीत ताडोबा अभयारण्याला भेट देणार आहेत.

शुक्रवार, दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी दहाला मोटारीने एमटीडीसी विश्राम गृह वरोराकडे प्रयाण. दुपारी बाराला वरोरा येथून विदर्भ क्रिकेट असोसिएशन जामठा, नागपूर येथे आगमन. दुपारी 12.15 वाजता विदर्भ क्रिकेट असोसिएशन जामठा येथून मोटारीने कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेककडे ते प्रयाण करतील. त्यानंतर ते कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक येथील ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार ज्ञानार्जन केंद्र इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी तीनला विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून राजभवन नागपूर येथे रात्री त्यांचा मुक्काम राहील.

शनिवार, दिनांक 16 जानेवारीला सकाळी साडेदहा ते साडेअकरा दरम्यान राजभवन येथे आयोजित ऑईल आणि गॅस कॉन्झरवेशन ड्राईव्ह-“ सक्षम-2021” ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. दुपारी बारा ते दीड दरम्यान दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राला भेट आणि बैठकीस उपस्थित राहतील. त्यानंतर राजभवनकडे रवाना होतील. दुपारी अडीच वाजता राजभवन येथे आगमन. सायंकाळी पाचला राजभवन येथे आयोजित कोरोना योद्धा सत्कार समारंभास उपस्थिती.

रविवार, दिनांक 17 जानेवारीला दुपारी 4 वाजता राजभवन येथून विमानतळाकडे ते प्रयाण करतील. दुपारी 4.45 वाजता नागपूर विमानतळावरुन ते मुंबईला रवाना होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here