Home मराठी रिपब्लिकन आघाडी तर्फे भीमा कोरेगाव च्या वीर शहिदांना सामूहिक मानवंदना

रिपब्लिकन आघाडी तर्फे भीमा कोरेगाव च्या वीर शहिदांना सामूहिक मानवंदना

359
0

नागपूर ब्यूरो : इंदोरा चौक येथे 1 जानेवारी 2021 ला भीमा कोरेगाव येथील वीर सैनिकांना मानवंदना देण्यात आली. भीमा कोरेगाव युद्धातील 500 वीरांनी दृष्ट पेशवाई संपवली, त्या वीरांना अभिवादन करण्यात आले आणि त्या युद्धाचा इतिहास जनतेसमोर सांगण्यात आला। या प्रसंगी संजय जीवने यांनी भीमा कोरेगावचा संपूर्ण इतिहास जनतेसमोर ठेवला.

भीमा कोरेगाव सैनिकांचे वंशज आज समता सैनिक दलां मार्फत अन्याय अत्याचार दूर करत आहे. म्हणून आपण संपूर्ण समता सैनिक दल अधिक बळकट केले पाहिजे ,वीरांना मानवंदना दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांचे जे अप्रकाशीत आहे ते साहित्य लवकरात लवकर प्रकाशित करावे व जी समिती रद्द केली तिचे पुनर्घटन करावे
या मागण्याकरिता एक साक्षरता अभियान सुरू करण्यात आले आहे.

त्याची सुरुवात आज इंदोरा चौकात झाली आणि त्यानंतर ही जी स्वाक्षरी मोहीम, इंदोरा चौकातून संपूर्ण नागपुरात, विदर्भात आणि संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जाईल असे जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर रिपब्लिकन आघाडीतील सर्व मान्यवर उपस्थित होते.

यावेळेस रिपब्लिकन आघाडीचे मान्यवर विनायक जामगडे निरंजन जी वासनिक, डॉ. सुजित बागडे, राजरत्न कुंभारे, घनश्यामजी पुसे, संजय फुलझेले, रवी पाटील, भोजराज रहाटे, दिनेश अंडर सहारे, संजय पाटील, सचिन गजभिये, शिरीष धंद्रव्यर, विश्वास पाटील, सूनील जवादे, निखिल कांबळे, प्रमोद बंजारी, दीपक वालदे, लालू राम शाहू, श्रीधर खापर्डे, सुदर्शन मून, प्रशांत मेश्राम, राजेश शेंडे, राजेश चौरसिया, टी एन कोटांगळे गुरुजी, गुलाबराव नंदेश्वर, परसराम गौरखेडे, आशिष मेश्राम, चरण पाटील, खुशाल चिंचखेडे, शेषराव रोकडे गुरुजी, डॉ. जनबंधू, संजीवन वालदे, शेषराव गणवीर, संघर्ष नाईक इत्यादी कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात परिसरातील जनता उपस्थित होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here