Home मेट्रो Nagpur Metro | रविवारी 22 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी केला मेट्रो प्रवास

Nagpur Metro | रविवारी 22 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी केला मेट्रो प्रवास

513
0

या वर्षीचा सर्वोच्च रायडरशीप उच्चांक नागपूर मेट्रोने गाठला

नागपूर ब्यूरो : रविवारी प्रवासी सेवे मध्ये तुफान गर्दी आढळून आली तब्बल २२ हजार पेक्षा जास्त नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला. या आधीचे सर्व उच्चांक मोडत नागरिकांनी मेट्रो स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सकाळी 8 वाजल्या पासून मेट्रो स्टेशन येथे जमा होऊ लागले. सिताबर्डी मेट्रो स्टेशन व्यतिरिक्त प्रवासी नागरिकांनी ऑरेंज लाईन मार्गिकेवरील रहाटे कॉलोनी, अजनी चौक, जयप्रकाश नगर, एयरपोर्ट मेट्रो स्टेशन, साउथ एयरपोर्ट मेट्रो स्टेशन, न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशन आणि खापरी मेट्रो स्टेशन तसेच ऍक्वा लाईन मार्गिकेवरील झांसी राणी चौक, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स, शंकर नगर चौक, एलएडी चौक, सुभाष नगर, रचना रिंग रोड जंकशन, वासुदेव नगर, बंसी नगर, लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथून व्यावसायिक मेट्रो सेवेचा लाभ घेतला. मुख्य म्हणजे प्रत्येक वयोगटातील नागरिक,विविध सामाजिक संस्थेनी देखील आज मेट्रो ने प्रवास केला.

नागपूर शहरामध्ये 25 कि.मी. अंतराचे मेट्रोचे जाळे नागरिकांन करिता उपलब्ध असून या मार्गिकेवर दर 15 मिनिटांनी मेट्रो ट्रेन प्रवाश्यांच्या सेवेकरता सज्ज आहे. सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी व सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान नियमित मेट्रो सेवेचा लाभ घेत येत आहे. महा मेट्रोने ऑरेंज लाइन वरील रिच-1 अंतर्गत खापरी मेट्रो स्टेशन ते सिताबर्डी इंटरचेंज दरम्यान व्यावसायिक सेवा मागील वर्षी मार्च पासून सुरु केल्या असून या वर्षी अँक्वालाईन मार्गिकेवर या जानेवारी महिन्यापासून प्रवासी सेवा नागरिकांन करिता सुरु करण्यात आल्या.

महा मेट्रो तर्फे प्रवाश्याकरिता विविध सोई सुविधा मल्टी मॉडेल इंट्रिग्रेशन अंतर्गत उपलब्ध करण्यात येत असून मेट्रो प्रवास सोबत आता आपली स्वतःची किंवा फिडर सर्विस येथील उपलब्ध सायकल देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याकरिता सायकल मेट्रो ट्रेन मध्ये घेऊन जाण्यासंबंधी सेवा महा मेट्रोने सुरु केली असून नागरिकांना याची पसंती मिळत आहे. तसेच शहरातील प्रतिष्टीत व्यक्ती, अधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील नागरिक मेट्रोने प्रवास करून नागरिकांनी जास्तीत जास्ती मेट्रोचा उपयोग करावा या करिता नागरिकांना प्रेरित करीत आहेत तसेच महा मेट्रोने शहरातील व स्टेशन परिसरातील प्रतिष्टीत व्यक्तीना महा मेट्रोच्या स्टेशनचे अॅेम्बेसेडर म्हणून महा मेट्रोशी जोडले आहे.

कोविड नंतर सुरु झालेल्या मेट्रो सेवेचा वाढता रायडरशीप ग्राफ 
  • 27/12/2020:- 22000
  • 20/12/2020:- 17562
  • 13/12/2020:- 15404
  • 06/12/2020:- 13187
  • 29/11/2020:- 11488
कोविड पूर्वी (रविवार रायडरशीप)

26-01-2020 :- 21258
09-02-2020 :- 17968
02-02-2020 :- 17749
16-02-2020 :- 16579
23-02-2020 :- 13726

मेट्रो प्रवाश्याकरिता रविवार ठरला कार्निवल डे 

आज सुमारे 6 तास संगीत वाद्य कार्यक्रमाचे आयोजन सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन येथे करण्यात आले होते ज्यामध्ये केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलातर्फे बँड वादनाचे कार्यक्रम तसेच सूर संगम संस्थेतर्फे गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिवाय स्टेशन परिसरात खाण्याकरता विविध प्रकारचे, तसेच शॉपिंग करता देखील स्टॉल लावण्यात आले होते. या शिवाय आयुर्वेदिक तसेच पर्यावरण पूरक वस्तू देखील विक्रीला स्टेशन परिसरात प्रवाश्याकरिता उपल्बध होत्या.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here