Home हिंदी ‘ख्रिसमस डे’ च्या पूर्व संध्येला सीआरपीएफ चे मेट्रो स्टेशन वर बॅण्ड वादन

‘ख्रिसमस डे’ च्या पूर्व संध्येला सीआरपीएफ चे मेट्रो स्टेशन वर बॅण्ड वादन

625

सिताबर्डी इंटरचेंज स्टेशन वर नागरिकांनी अनुभवला उत्साहपूर्ण कार्यक्रम


नागपूर ब्यूरो : आज ‘ख्रिसमस डे’ च्या पूर्व संध्येला सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन येथे ख्रिसमस डे दिनानिमित्य सीआरपीएफ बॅण्ड पथकाचे सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन येथे बॅण्ड वादन करण्यात आले. सायंकाळी 5 वाजता पासून ते रात्री 8 वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन महा मेट्रो आणि सीआरपीएफच्या वतीने करण्यात आले होते. या पथकामध्ये सीआरपीएफ जवानांचा समावेश होता ज्यामध्ये त्यांनी देशभक्ती वादन सादर केले. स्टेशन परिसरातील प्रवाश्यांनी या उत्साहवर्धक कार्यक्रमाचा आनंद घेतला.


मागील आठवड्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोलीस उपमहानिरीक्षक प्रशांत जांभुळकर ह्यांनी त्यांच्या सहकाºयांसह महा मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन मार्गिकेवरील लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी इंटरचेंज दरम्यान मेट्रोने प्रवास केला. नागपूर मेट्रोचा प्रवास सोईस्कर, सुखकर व सुरक्षित असून नागपूरकरांनी तसेच सीआरपीएफ येथे रहिवासी असलेल्या जवान व त्यांच्या कुटुंबीयांनी मेट्रो सेवेचा उपयोग करावा. मेट्रोच्या स्वरूपात अत्यंत चांगली सुविधा आज शहरातील नागरिकांना उपलब्ध असून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मेट्रोचा उपयोग करावा असे आवाहन जांभुळकर यांनी केले होते.

लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथे सीआरपीएफ द्वारे वॉल आॅफ फ्रेम उभारून नागरिकांना माहिती तसेच मेट्रो सेवेचा उपयोग करण्याकरिता प्रोत्साहित करने तसेच नागपूर व राज्यातील शहीद जवानांच्या बलिदाना बद्दल अवगत करणे, सुरक्षित आणि सुरळीत फिडर सर्विस करिता सीआरपीएफ जवानांची लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथे तैनाती करने, ख्रिसमस डे, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन तसेच अन्य महत्वाच्या दिवशी पोलीस बँडचे मेट्रो स्टेशन येथे संचालन करने या सर्व बाबींवर विस्तृत चर्चा करण्यात आली याच अनुषंगाने आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महा मेट्रोच्या वतीने या आधी देखील सिताबर्डी इंटरचेंज येथील बँड स्टॅन्ड येथे अश्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व नवोदित कलाकारांनी या ठिकाणी प्रस्तुती दिली होती.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleNagpur | विश्व सिंधी सेवा संगम ने मनाया किसान दिवस
Next articleजिंदगीभर लोन की किश्तें चुकाने से इस तरह छुटकारा पा सकते हैं आप
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).