Home हिंदी Nagpur | पेट्रोल दरवाढी विरोधात राकांपा ने केला केंद्र सरकार चा निषेध

Nagpur | पेट्रोल दरवाढी विरोधात राकांपा ने केला केंद्र सरकार चा निषेध

776

नागपूर ब्यूरो : राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाव्दारे मंगळवार ला शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या नेतृत्वात गणेशपेठ येथे केंद्र सरकारच्या चुकीच्या नीती व पेट्रोल दरवाढी विरोधात ठिय्या धरणे आंदोलन करण्यात आले.

मागील वर्षापासुन सतत पेट्रोल -डिझेल ची दरवाढ होत आहे .मागील वर्षी 80 रुपयावर असणारे पेट्रोल दर वाढत -वाढत 90 रु.वर पोहचले आहे. शनिवारी पेट्रोलची किंमत 90.62 पैसे तर डिझेल 80.86 पैसे होते. ही दरवाढ आतापर्यंतचा उच्चांक दर आहे.

या छुप्या दरवाढीमुळे दैनंदिन वस्तुचे भाव दिडपट वाढले आहे.आधीच कोरोना संकटामुळे जनता भयभीत आहे.संपुर्ण देशात विविध कारणामुळे अस्थीरतेचे वातावरण आहे.केंद्र सरकारच्या बेजबाबदार आर्थीक नितीमुळे प्रचंड बेरोजगारी वाढली आहे.एकीकडे उद्दोग बंद पडत चालले आहे तर दुसरीकडे खाजगीकरणामुळे कर्मचारीवर्ग धास्तावला आहे.केंद्र सरकार नेमक देशात काय करु पहात आहे असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. आहे.शेतकरी आंदोलन संपुर्ण देशात सुरु आहे.अशातच हि छुपी तेल दरवाढ म्हणजे जनतेच्या खिश्यावर टाकलेला दरोडा आहे अशी प्रतिक्रीया शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी दिली.

या डिझेल -पेट्रोल दरवाढीमुळे जिवनावश्यक वस्तुचे भाव आकाशाला भिडले असुन गृहणीचे बजेट बिघडले आहे. ही दरवाढ त्वरीत मागे घेण्यात यावी अशी मागणी राकांपा तर्फे करण्यात आली.

या आंदोलनात जानबाजी मस्के, अशोक काटले, मिलिंद मानापुरे, श्रीकांत शिवणकर, महेंद्र भांगे, अविनाश शेरेकर, नूतन रेवतकर, धनंजय देशमुख, प्रकाश लिखाणकर, सुखदेव वंजारी, सुरेश करणे, चंद्रकांत नाईक, मेहबूब पठाण, अमोल धनुषकर, नंदकिशोर माहेश्वरी, नागेंद्र आठवणकर, विनोद कावळे, मोरेश्वर जाधव, नागेश वानखेडे, धर्मपाल वानखेडे, सुनीता जुमळे, राकेश गजभिये, शाईन शेख, फारुक शेख, रफिक शेख, सुनीता पांडे, नीता पांडे, मानकर, सुनिता विभुते, ललिता पवनकर, नितीन गोडघाटे, मीना मसराम, चंदु तुपकर सहभागी होते.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articlePune | नव्या शिक्षण धोरणामुळे देशाला नवी दिशा- डॉ. नजमा हेपतुल्ला
Next articleआंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ विधेयकास विधानमंडळाची एकमताने मंजूरी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).