Home हिंदी Maha Metro | शंकर नगर आणि रचना रिंग रोड जंक्शन स्टेशनला ‘सीएमआरएस’चे...

Maha Metro | शंकर नगर आणि रचना रिंग रोड जंक्शन स्टेशनला ‘सीएमआरएस’चे प्रमाणपत्र

694

नागपूर ब्यूरो : रहाटे कॉलोनी, अजनी चौक, बंसी नगर आणि एलएडी मेट्रो मेट्रो स्टेशन नंतर आता सुभाष नगर आणि रचना रिंग रोड जंक्शन मेट्रो स्टेशन देखील आता अनलॉक होण्यास सज्ज झाले असून रेल्वे सुरक्षा आयुक्त यांनी या दोन्ही मेट्रो स्टेशन येथून प्रवासी सेवा सुरु करण्या संबंधीचे प्रमाणपत्र महा मेट्रोला प्रदान केले आहे.

दिनांक 4 डिसेंबर 2020 रोजी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त श्री जनक कुमार गर्ग यांनी (रिच 3 – ऑरेंज अँक्वा लाईन) अंतर्गत सुभाष नगर आणि रचना जंकशन मेट्रो स्टेशनची पाहणी करत स्टेशन परिसरात प्रवाश्यांकरता असलेल्या विविध सुविधांचे निरीक्षण करत स्टेशन परिसरात करण्यात आलेल्या सोयी-सुविधा सोबत संरक्षा व सुरक्षेचा आढावा घेत सीएमआरएस पथकाने समाधान व्यक्त केले होते.

मेट्रो स्टेशन होत आहे नागरिकांकरिता खुले

महा मेट्रोचे निर्माण कार्य गतीने सुरु असून सप्टेंबर महिन्यात अजनी चौक, रहाटे कॉलोनी, एलएडी चौक आणि बंसी नगर मेट्रो स्टेशन नागरिकांच्या सेवेत दाखल झाले होते व लौकरच आणखी 2 नवीन मेट्रो स्टेशन प्रवाश्याच्या सेवेत दाखल होणार आहे. सीएमआरएसचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे 16 मेट्रो स्टेशनच्या ऐवजी आता 18 मेट्रो स्टेशन (ऑरेंज लाईन मार्गिकेवरील 8 मेट्रो स्टेशन व अँक्वा लाईन मार्गिकेवरील 10 मेट्रो स्टेशन) येथून मेट्रो सेवा नागरिकांकरिता उपलब्ध असतील.

उत्तम दर्ज्याचे मेट्रो स्थानक नागरिकांच्या सेवेत – डॉ. ब्रिजेश दीक्षित

सुभाष नगर आणि रचना रिंग रोड जंक्शन मेट्रो स्टेशन येथून प्रवासी सेवा सुरु करण्या संबंधीचे सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाल्याबद्दल महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सर्व कामगार, निर्माण कार्य स्थळी असलेले कर्मचारी,अधिकारी यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. महा मेट्रोचे निर्माण कार्य गतीने सुरु असून मेट्रो स्टेशन नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने मेट्रो सेवेचा उपयोग करावा व आपल्या सोबत इतरांना देखील मेट्रोचा वापर करण्यास प्रेरित करावे असे आवाहन डॉ. दीक्षित यांनी नागरिकांना केले.

उत्तर अंबाझरी मार्गावरील शंकर नगर चौक आणि रचना रिंग रोड जंक्शन मेट्रो स्टेशन ‘अँक्वा थीम’ वर बनविण्यात आले आहे. शंकर नगर चौक (6996.00) वर्ग मीटर क्षेत्रांमध्ये मेट्रो स्टेशनची उभारणी करण्यात आली असून या स्टेशनच्या परिसरात शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालय, बँक, बाजारपेठ तसेच मोठ्या प्रमाणात लोक वस्ती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या स्टेशनचा परिसरातील नागरिकांना लाभ होणार आहे.

या व्यतिरिक्त रचना रिंग रोड जंक्शन मेट्रो स्टेशनची (3488.07) वर्ग मीटर क्षेत्रांमध्ये उभारणी करण्यात आली आहे व या स्टेशनच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात लोक वस्ती आहे. तसेच सदर स्टेशन हिंगणा टी पॉईंट वर असून, या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात नागरिक हिंगणा व सिताबर्डीच्या दिशेने ये – जा करतात. या स्टेशनच्या मार्गावर शैक्षणिक संस्था, औद्योगिक वसाहत, वसतीगृह, मोठी बाजारपेठ असल्यामुळे या परिसरात प्रवाश्यांची नेहमीच गर्दी असते त्यामुळे आता सदर मेट्रो स्टेशन खुले झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे.

या दोन्ही स्टेशनच्या (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन/निर्गमनची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. ग्राउंड लेव्हल, कॉनकोर्स लेव्हल आणि प्लॅटफॉर्म अश्या तीन मजलीच्या दुसऱ्या म्हणजेच कॉनकोर्स लेव्हलवर तिकीट काउंटर व स्टेशन कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleNagpur | चिनाब खोऱ्यावरील कॉफी टेबल बुक प्रकाशित
Next articleProtest | किसान संगठनों का आज भारत बंद
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).