Home हिंदी महिला काँग्रेस प्रदेश कार्यकारणी । आ. प्रतिभाताई धानोरकर उपाध्यक्ष तर नम्रता आचार्य...

महिला काँग्रेस प्रदेश कार्यकारणी । आ. प्रतिभाताई धानोरकर उपाध्यक्ष तर नम्रता आचार्य ठेमसकर सचिव पदी

615

चंद्रपूर ब्यूरो : जिल्ह्यातील एकमेव तत्पर महिला आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची महिला काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रपूरच्या राजकीय विश्लेषक नम्रता आचार्य ठेमसकर यांची महिला काँग्रेस सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.

नम्रता आचार्य- ठेमस्कर

आज महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्षा चारुलता टोकस यांनी त्यांची नियुक्ती केली. जिल्ह्यातील महिलांचा आवाज सभागृहात मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आ. प्रतिभाताई धानोरकर करीत आहेत. युवतींना माईनिग शाखेत प्रवेश मिळवून देण्याचे मोठे काम त्यांच्या पाठपुराव्यातून झाले आहे. सतत महिलांचा सोबत राहून त्यांचे प्रश्न जाणून ते प्रत्यक्षात मार्गी काढणारी आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत प्रदेश महिला काँग्रेसने त्यांना हि जबाबदारी दिली आहे,

त्यासोबतच समाज माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे, महिलांचे प्रश्न लावून धरणारी महिला म्हणून नम्रता आचार्य ठेमसकर यांची ओळख आहे. त्यांचा कामाची दखल घेत त्यांची महिला काँग्रेस सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती बद्दल पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे यांनी शुभेच्छा दिल्या आहे, या नियुक्ती मुळे जिल्ह्यातील महिला काँग्रेसला येत्या काळात बळ मिळणार आहे. चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस मध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण आहे. सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleविजय वडेट्टीवार | मंत्री पद गेलं तरी चालेल, पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही
Next articleमहामानवाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे दीक्षाभूमीवर अभिवादन
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).