Home हिंदी Maharashtra। कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता

Maharashtra। कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता

636

मुंबई ब्यूरो : संसदेचे हिवाळी अधिवेशन पुढे गेल्यानंतर राज्यातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबाबतही प्रश्नचिन्ह आहे. कोरोनामुळे राज्याचे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता आहे. ७ डिसेंबरपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मात्र राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने हिवाळी अधिवेशन डिसेंबरऐवजी जानेवारीपर्यंत पुढे ढकलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत उद्याच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच होणार कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. पण आता कोरोनाच्या संकटामुळे अधिवेशन होणार की नाही याबाबतच प्रश्नचिन्ह आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. दुसरीकडे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशी चर्चा ही जनतेमध्ये सुरु झाली आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची नवी लाट आल्याने काही ठिकाणी रात्री कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात लोकं बाहेर पडत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढल्याची भीती व्यक्त होत आहे. दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे येणारे काही दिवस महत्त्वाचे आहेत, असं जाणकार सांगत आहेत.

Previous article2020 में हमने क्या सीखा | विश्व सिंधी सेवा संगम की अनूठी प्रतियोगिता
Next articleआरक्षणाची गरज नाही, फक्त 9 हजारात ताडोब्यात देत होते प्रवेश!
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).