Home हिंदी आरक्षणाची गरज नाही, फक्त 9 हजारात ताडोब्यात देत होते प्रवेश!

आरक्षणाची गरज नाही, फक्त 9 हजारात ताडोब्यात देत होते प्रवेश!

862

चंद्रपूर ब्यूरो : ताडोबा अभयारण्यात पर्यटनाला आलेल्या पर्यटकांकडून पैसे घेत प्रवेश देण्याची घटना उघडकीस आली असून यामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे सर्रास पर्यटकांकडून पैसे घेऊन त्यांना विना आरक्षण प्रवेश देत होते.

नवेगाव कोअर प्रवेशद्वारावर वनरक्षक टेकचंद सोनूले यांनी सचिन कोयचाडे नावाच्या व्यक्तीला सोबत घेत हा प्रकार करीत असल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. या अगोदर त्यांनी अनेक लोकांकडून पैसे उधळले असल्याची ही माहिती मिळत आहे.

सदर आरोपी 1 डिसेंम्बरला नवेगाव प्रवेश द्वारावर पर्यटकांकडून पैसे घेत गेटच्या आत प्रवेश देत असल्याची माहिती वनविभागाच्या क्षेत्र संचालक यांना मिळाली. त्यांनी तात्काळ नवेगाव प्रवेशद्वार गाठून दोघांना सक्तीने विचारपूस केली असता पर्यटकांकडून 9 हजार रुपये घेत असल्याची त्यांनी कबुली दिली. विशेष म्हणजे, असा प्रकार अनेकदा केला असल्याचे सुद्धा क्षेत्रसंचालक यांच्या समक्ष वनरक्षक सोनूले व कोयचाडे यांनी सांगितले.

दोघांविरुद्ध चिमूर पोलीस स्टेशनला तक्रार देत ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. ताडोबा व्याघ्रप्रकल्प चे आरक्षण मिळविण्यासाठी वनविभागाने कोणत्याही खाजगी व्यक्तीची नेमणूक केलेली नाही, पर्यटकांनी अश्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, आरक्षणासाठी  www.mytadoba.org या संकेतस्थळाचा वापर पर्यटकांनी करावा असे आवाहन ताडोबा व्याघ्रप्रकल्पतर्फे करण्यात आले आहे.

Previous articleMaharashtra। कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता
Next articleभाजपा प्रदेश प्रभारी रवि ने किए दीक्षा भूमि और समाधि स्थल के दर्शन
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).