Home हिंदी पदविधर मतदार संघ निवडणुक । राऊत, संजीव कुमार, ठाकरे यांनी केले मतदान

पदविधर मतदार संघ निवडणुक । राऊत, संजीव कुमार, ठाकरे यांनी केले मतदान

नागपूर ब्यूरो : महाराष्ट्र विधान परिषेदेच्या नागपूर विभाग पदविधर मतदार संघासाठी मंगळवार दिनांक 1 डिसेंबर रोजी विभागातील 322 मतदान केंद्रावर सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विभागातील प्रशासन सज्ज आहे. नागपूर विभागात सकाळी 8 ते 12 दरम्यान 19.70 टक्के मतदान झाले अशी माहिती आहे.

मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विभागात एकुण 1288 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदारांना मतदानापूर्वी थर्मल स्क्रीनिंग तसेच मास्कचा वापर करुनच आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी केले आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी सकाळी पदविधर मदारसंघातील निवडणुकीत आपले मतदान नागसेन विद्यालय कामठी रोड येथील केन्द्रावर केले.

नागपूर चे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार व श्रीमती सुप्रिया यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
विशेष म्हणजे अंजली रंगारी यांनी 2 दिवसांपूर्वी अपघात होऊनही आज मतदानाचा हक्क बजावला. कोविड सुरक्षा नियमानुसार पदवीधर मतदान प्रक्रिया जिल्ह्यात सुरू होती.

पदविधर मतदार संघाच्या निवडणूकी साठी नागपूरच्या रवीनगर येथील दादाजी धुनिवाले मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व सौ. ज्योत्स्ना ठाकरे यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला.

19 उमेदवार रिंगणात

नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत 19 उमेदवार रिंगणात आहेत. अभिजीत वंजारी ( भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस ), संदीप जोशी (भाजप), राजेंद्रकुमार चौधरी (रिपब्लीक पार्टी ऑफ इंडीया), इंजीनियर राहुल वानखेडे (वंचित बहुजन आघाडी), ॲङ सुनिता पाटील (इंडियन नॅशनल मानवाधिकार पार्टी), अतुलकुमार खोब्रागडे (अपक्ष), अमीत मेश्राम(अपक्ष), प्रशांत डेकाटे (अपक्ष), नितीन रोंघे (अपक्ष), नितेश कराळे (अपक्ष), डॉ.प्रकाश रामटेके (अपक्ष), बबन ऊर्फ अजय तायवाडे (अपक्ष), ॲड. मोहम्मद शाकीर अ.गफफार (अपक्ष), सीए. राजेद्र भुतडा, प्रा.डॉ.विनोद राऊत (अपक्ष), ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल , शरद जीवतोडे (अपक्ष) , प्रा.संगीता बढे (अपक्ष), इंजीनियर संजय नासरे(अपक्ष) या उमेदवारामध्ये लढत होणार आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here