Home हिंदी Majhi Metro । हॉक रायडर्स समूह ने केला सायकल सह प्रवास

Majhi Metro । हॉक रायडर्स समूह ने केला सायकल सह प्रवास

741

नागपूर ब्यूरो : नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर 15 मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून नागरिक याचा वापर करीत आहे. मेट्रो प्रवास सोबत आता आपली स्वतःची किंवा फिडर सर्विस येथील उपलब्ध सायकल देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याकरिता सायकल मेट्रो ट्रेन मध्ये घेऊन जाण्यासंबंधी सेवा सुरु केली असून नागरिकांना याची पसंती मिळत आहे , या अनुषंगाने आज सकाळी हॉक रायडर्स या सायकलिस्ट समूहाने मेट्रो ट्रेन मध्ये सायकल सोबत बाळगून मेट्रोने प्रवास केला तसेच खापरी स्टेशन येथे उतरून मिहान येथील परिसरात सायकल ने राईड करत परत खापरी ते सिताबर्डी पर्यंत प्रवास केला. सुमारे 20- ते 25 सायकलिस्ट यामध्ये सामील झाले होते. ज्यामध्ये 5 वर्ष वयोगटाचे सायकलिस्टनी देखील मेट्रोने प्रवास केला.

महा मेट्रो प्रशासननाने नागरिकांना सायकल सोबत घेऊन जाण्याकरिता सेवा उपलब्ध केली आहे. या आधी देखील काही मेट्रो प्रवाश्यानी सुभाष नगर मेट्रो स्टेशन येथून लोकमान्य नगर स्टेशन दरम्यान त्यांनी स्वतः सायकल सोबत बाळगून मेट्रोने प्रवास केला होता.

हॉक रायडर्स समूहांचे प्रमुख अजय बंसोड यांनी सांगितले कि महा मेट्रोने अतिशय चांगली सेवा आमच्या सारख्या सायकलिस्ट करता उपलब्ध करून दिली असून त्या करता आम्ही मेट्रो प्रशासनाचे आभार मानतो. शहरात मोठ्या प्रमाणात सायकलिस्ट असून जे दररोज सायकल ने प्रवास करून कॉलेज, ऑफिस तसेच इतर ठिकाणी ये जा करतात. सायकल मेट्रो मध्ये सोबत नेणे सोईस्कर झाले असून आमचा आजचा प्रवास अत्यंत आनंददायक ठरला व आमच्या समूहाने या सेवेचा भरपूर आनंद घेतला व या पुढे देखील आम्ही सर्व सायकल सोबत बाळगून मेट्रोने प्रवास करू व इतरांना देखील या करता प्रेरित करू अशी भावना बंसोड यांनी व्यक्त केली.

महा मेट्रो या अनोख्या प्रवास करता प्रवाश्याना आवाहन करते कि मेट्रो प्रवासी आता कुठल्याही ठिकाणी जाण्याकरिता सहज पणे मेट्रो मध्ये सायकल सोबत बाळगून प्रवास करू शकतात. त्यामुळे आता मेट्रो सोबत सायकल अशी पर्यावरणपूरक प्रवासी सेवा नागरिकांच्या फायद्याची ठरणार आहे. मेट्रो कोच येथे सायकलिस्ट करता योग्य सूचना फलक तसेच सायकल ठेवण्याकरिता योग्य जागा नेमली आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articlePositive Story । गावाकडे परतलेल्या तरुणांच्या परिश्रमातून साकारली अभ्यासिका
Next articleRavindra Thakre । निवडणुकीत सोशल माध्यमांवर सायबर सेलची करडी नजर
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).