नागपूर ब्यूरो : “मृत्यू अटळ आहे. माणसे येतात आणि जातात. परंतु काही माणसे आपल्या कर्तृत्वाने अमर होतात. कीर्ती आणि कर्तृत्व या दोन गोष्टी कर्तृत्ववान पुरुषाला कीर्ती प्राप्त होतेच असे नाही. तसेच कीर्तीप्राप्त पुरुष कर्तृत्ववान असतातच असेही नाही. परंतु आपल्या कर्तृत्वाने अमर झालेल्या आणि कर्तृत्वाने कीर्ती प्राप्त केलेल्या भाग्यवान मंडळींमध्ये स्व. यशवंतराव चव्हाण यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल” असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले यांनी व्यक्त केले.
“स्व. यशवंतराव चव्हाण हे तळागळातील कार्यकर्त्यांचे कैवारी होते. त्याचप्रमाणे दुर्बल घटकांवर लक्ष ठेवणारे, शेतीबाबत धोरणाबाबत पुरोगामी दृष्टिकोन ठेवणारे नेते होते” असे मत या प्रसंगी अनिल अनिल अहिरकर आमदार दीनानाथ पडोळे यांनी केले.
आज अजनी चौक, वर्धा रोड, नागपूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी आमदार दीनानाथ पडोळे, आयोजक दिलीप पनकुले, मधुकर भावसार, महादेवराव फुके मुन्ना तिवारी भैयालाल ठाकूर सेवादलाचे राजेश तिवारी हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रसंगी विजय मसराम, राहूल एन्नावर देवआनंद रडके चंद्रभान कवाडे रामदास डोंगरे ,रवींद्र मुल्ला संजय शेवाळे प्रशांत लांडगे सुभाष ढोरे मच्छिंद्र आवळे, बबलू चव्हाण,राजू निनावे मंदार हर्षे, भाईजी मोहोड, सोपानराव शिरसाट, प्रमोद जोंधळे,संग्राम पनकुले, ॲड. सुदर्शन पनकुले, चरणजितसिंह चौधरी उपस्थित होते.
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).