Home हिंदी Chandrashekhar Bawankule | मुख्यमंत्र्यांकडून उर्जामंत्र्यांवर जाणुनबुजून अन्याय

Chandrashekhar Bawankule | मुख्यमंत्र्यांकडून उर्जामंत्र्यांवर जाणुनबुजून अन्याय

693

नागपूर ब्यूरो : अगोदरच ह्यकोरोनाह्णमुळे जनतेचे कंबरडे मोडले असताना महाविकासआघाडी सरकारच्या कचखाऊ धोरणामुळे लाखो वीजग्राहकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. 96 लाख ग्राहकांनी वीजबिल भरलेले नाही. सरकारच्या मनात आले तर सहजपणे ही समस्या दूर होऊ शकते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार जाणुनबुजून उर्जामंत्री नितीन राऊत यांचे नाव खराब करत आहेत. त्यांच्याकडून राऊत यांच्यावर जाणुनबुजून अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी लावला.

गुरुवारी नागपूर पत्रकार क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. आमच्या कार्यकाळात आम्ही थकबाकीच्या कारणासाठी कुणाचीही वीज जोडणी कापली नाही. लॉकडाऊनच्या कालावधीत लोकांना अव्वाच्या सव्वा बिले आली. 96 लाख ग्राहकांनी वीजबिल भरलेले नाही. त्यांच्या जोडण्या कापण्याची तयारी सुरू आहे. ही मुघलशाही आहे का असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. नागपुरात हिवाळी अधिवेशन घेणे सहज शक्य होते. मात्र कोरोना संक्रमणाच्या नावाखाली नाटक करण्यात आले. जास्त मोर्चे येणार व विरोधाची धार टोकदार राहणार हे सरकारला कळाले होते. म्हणूनच नागपुरात अधिवेशन घेणे टाळण्यात आले, असेदेखील बावनकुळे म्हणाले.

महाविकासआघाडी शासनाने विदर्भावर अन्याय केला आहे. विदर्भ वैधानिक मंडळाची मुदत न वाढविणे हे तर मोठे पापच आहे. आता मंडळच नसल्याने सरकारला विदर्भातीलअनुशेष कसा कळणार व कशाच्या आधारावर अर्थसंकल्पीय तरतूद होणार असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleChandrapur | पदवीधरांचे नेतृत्व संदीप जोशींच्या हातात द्या : सुधीर मुनगंटीवार
Next articleElection | भाजपा के लिए पृथक विदर्भ का मुद्दा तो सिर्फ चुनावी है…
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).