Home हिंदी Chandrapur | पदवीधरांचे नेतृत्व संदीप जोशींच्या हातात द्या : सुधीर मुनगंटीवार

Chandrapur | पदवीधरांचे नेतृत्व संदीप जोशींच्या हातात द्या : सुधीर मुनगंटीवार

770

चंद्रपुरात भाजपा कार्यकारिणी मेळाव्यात आवाहन

चंद्रपूर ब्यूरो : विधानपरिषदेचा पदवीधर मतदारसंघ म्हणजे उच्चशिक्षित मतदारांचा मतदारसंघ. या मतदारसंघातील प्रश्न आणि समस्या वेगळ्या आहेत. ज्या मतदारसंघाचे नेतृत्व कधी काळी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी केले, त्या मतदारसंघात आता नव्या दमाचा उमेदवार संदीप जोशी यांच्या रूपाने सज्ज आहे. त्यांच्या हातात पदवीधरांचे नेतृत्व द्या, असे आवाहन राज्याचे माजी अर्थमंत्री बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या निवडणूक प्रचारार्थ चंद्रपूर येथील लोकमान्य टिळक विद्यालयाच्या पटांगणावर भाजपा कार्यकारिणी सदस्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी, चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार, प्रदेश सचिव राजेश बकाने, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) देवराव भोंगळे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष (महानगर) डॉ. मंगेश गुलवाडे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी पुढे बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पदवीधर मतदारसंघात नागपूरनंतर सर्वाधिक मतदार चंद्रपूर जिल्ह्यात आहे. चंद्रपूर जिल्हा नेहमीच भाजपसोबत राहिला आहे. कारण भारतीय जनता पार्टीने गेल्या काही वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात जो विकास घडवून आणला त्याला तोड नाही. पदवीधर मतदारसंघातही गेल्या अनेक दशकांपासून भाजपचेच राज्य आहे. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी या मतदारसंघाला नवी ओळख दिली. नितीनजींजवळ जे व्हिजन आहे, तेच व्हिजन संदीप जोशी यांच्याकडे आहे. त्यांच्या प्रत्येक संकल्पना अभिनव असतात. त्यांच्या हातात या मतदारसंघाचे नेतृत्व द्या, असे आवाहन त्यांनी केले.

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, संदीप जोशी हा संवेदनशील मनाचा राजकारणी आहे. समाजातील अस्वस्थ करणाऱ्या घटनांतून त्यांनी अनेक समाजउपयोगी प्रकल्प उभारले. असे समाजकारणी अभावानेच राजकारणात येतात. मात्र, राजकारणात आल्यानंतर ते त्याचा उपयोग समाजकारणासाठी करवून घेतात. संदीप जोशी यांच्या रूपाने सामाजिक कार्यकर्त्याला पहिल्या पसंतीचे मत द्या आणि प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक मतदाराला त्यासाठी उद्युक्त करा, असे आवाहन केले.

पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी म्हणाले, आपण भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता आहो. आई आणि वडील शिक्षक असल्यामुळे शिक्षकांच्या आणि पदवीधरांच्या प्रश्नांची जाण आहे. मी आपल्यातीलच एक कार्यकर्ता आहे. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आपले प्रेरणास्थान आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपले मार्गदर्शक आहेत. सुधीरजी मुनगंटीवार यांचे कार्य हे माझ्यासाठी दिशादर्शक आहे. अशा नेत्यांच्या नेतृत्वात आपण भविष्यातही प्रामाणिक कार्य करण्याचा प्रयत्न करु, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleNagpur News Bulletine | दीनदयाल रुग्ण सेवेद्वारे आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाचे कार्य : जोशी
Next articleChandrashekhar Bawankule | मुख्यमंत्र्यांकडून उर्जामंत्र्यांवर जाणुनबुजून अन्याय
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).