Home हिंदी Diwali | आज वसुबारस म्हणजेच, गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस

Diwali | आज वसुबारस म्हणजेच, गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस

546
0
कोरोना संकटात संपूर्ण देशभरात दिवाळी आनंदाने पण साधेपणाने साजरी केली जाणार आहे. सगळीकडे दिवाळीची तयारी सुरु आहे. अशातच आजपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. आज गोवत्स द्वादशी म्हणजेच, वसुबारस. आश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केले जाते. गोवत्सद्वादशी म्हणजे गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजेच, द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात.

भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्‍यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. आश्‍विन वद्य द्वादशी, या तिथीला वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असे म्हणतात. समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून वसुबारस हे व्रत करण्यात येतं. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात.

वसुबारस व्रत :

या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गायीचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गायीला खाऊ घालतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे, वारसे आहेत, त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.

वसुबारस म्हणजेच गोवत्सद्वादशी हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीतही केला जातो. पण तंस पाहायला गेलं तर, तो सण वेगळा असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, देशातील बहुतांश ठिकाणी वसुबारसेपासूनच दिवाळीला सुरुवात होते, असं मानलं जातं. यंदा गुरुवार, म्हणजेच, 12 नोव्हेंबर 2020 रोजी निज अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे वसुबारस आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.

दिवाळीचे महत्त्वाचे दिवस :
  1. वसुबारस : निज अश्विन कृष्ण द्वादशी – 12 नोव्हेंबर 2020, गुरुवार.
  2. धनत्रयोदशी : निज अश्विन कृष्ण त्रयोदशी – 13 नोव्हेंबर 2020, शुक्रवार.
  3. नरक चतुर्दशी : निज अश्विन कृष्ण चतुर्दशी – 14 नोव्हेंबर 2020, शनिवार.
  4. लक्ष्मीपूजन : निज अश्विन अमावास्या – 14 नोव्हेंबर 2020, शनिवार.
  5. बलिप्रतिपदा/पाडवा : कार्तिक शुद्ध प्रतिपदा – 16 नोव्हेंबर 2020, सोमवार.
  6. भाऊबीज : कार्तिक शुद्ध द्वितीया – 16 नोव्हेंबर 2020, सोमवार.

    वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleDiwali | कब है धनतेरस, जानें शुभ मुहुर्त, पूजा विधि और महत्व ?
Next article‘कार’नामा | चिमुकलीचा हट्ट पुरवण्यासाठी 4 महिन्यात बनवली विंटेज कार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here