Home हिंदी Inauguration |आत्मनिर्भर भारत योजना जनते पर्यंत पोहचवा -गडकरी

Inauguration |आत्मनिर्भर भारत योजना जनते पर्यंत पोहचवा -गडकरी

763

नागपूर ब्युरो : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनते साठी आत्मनिर्भर भारत योजना आणली. या योजनेचा जनतेला लाभ मिळावा म्हणून भारतीय जनता पार्टी नागपुर शहर व जिल्ह्याच्या वतीने 178, धरमपेठ एक्सटेंशन, शिवाजी नगर येथे मार्गदर्शन केंद्र उघडण्यात आले.

आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. या वेळी भाजपा शहर अध्यक्ष व आमदार प्रवीण जी दटके, जिल्हा चे अध्यक्ष अरविंद गजभिये, महापौर संदीप जोशी, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, आमदार मोहन मते, आमदार विकास कुंभारे, विदर्भ संघटन मंत्री, उपेंद्र कोठेकर, भाजयुमो प्रदेश सदस्य राहुल खांगार उपस्थित होते. या प्रसंगी गरजू लोकांना आत्मनिर्भर योजने अंतर्गत ई-रिक्षा वाटप करण्यात आले.

आत्मनिर्भर योजना 20 लाख कोटींची आहे. या योजनेचा लाभ गरीबातल्या गरिबाला व्हायला पाहिजे ही योजना सर्व जनते पर्यंत पोहचवा अशी विनंती त्यांनी केली. कार्यक्रमाचे संचालन शहर आत्मनिर्भर योजनेचे संयोजक अनिरुद्ध पालकर यांनी केले. आभार प्रदर्शन आत्मनिर्भर मार्गदर्शन संयोजन नेहल खानोरकर यांनी केले.