Home हिंदी पदवीधर निवडणुक | अधिकारी-कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण दयावे

पदवीधर निवडणुक | अधिकारी-कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण दयावे

399
0

नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांचे निर्देश

नागपूर ब्यूरो : पदवीधर निवडणुकी आधी बॅलेट पेपरवर होत असत आता या निवडणुकीत उमेदवाराला पसंतीक्रम दयावा लागतो यासह अनेक सूक्ष्म बाबी असतात. यानुषंगाने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येण्याच्या दृष्टीने या निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिले.

आयुक्त कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरसींगव्दारे त्यांनी विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून निवडणुकीच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपायुक्त मिलींद साळवे, आशा पठाण, रमेश आडे, अप्पर जिल्हाधिकारी निशीकांत सुके, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खंजाची, यासह अन्य वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नुकताच भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यासाठी प्रशिक्षणात अधिकारी कर्मचाºयांना निवडणूक प्रक्रीयेतील प्रत्येक बाबीचे प्रशिक्षण दयावे. त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात यावे . वाहनासाठी परवानगी ही जिल्हापातळीवर जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्फत देण्यात येईल.

माध्यम संनियत्रण समिती देखील जिल्हाधिकारी यांच्या देखरेखी खाली राहील. तसेच निवडणूक प्रक्रीयेतील अहवाल हे वेळेवर विभागीय आयुक्त कार्यालयात पाठविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्यात.
प्रचार रॅलीबाबत आयोगाकडून मार्गदर्शन घेण्यात येत असून मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिग या कोविड त्रिसूत्रीचा अवलंब करून निवडणूक घेण्यात येत असल्याने मतदान केंद्रावर या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here