Home हिंदी Nagpur City : मास्क न लावणा-या 328 नागरिकांकडून दंड वसूली

Nagpur City : मास्क न लावणा-या 328 नागरिकांकडून दंड वसूली

682

आतापर्यंत १६७८३ व्यक्तिं विरुध्द कारवाई

नागपूर ब्यूरो : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (3 नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार 328 नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे 1 लक्ष 64 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी 16783 नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. 6749500/- चा दंड वसूल केला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्गाचा अदयापही धोका टळला नसताना अनेक ठिकाणी सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर ‍विनामास्क नागरिक फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे.

मंगळवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत 76, धरमपेठ झोन अंतर्गत 40, हनुमाननगर झोन अंतर्गत 20, धंतोली झोन अंतर्गत 7, नेहरुनगर झोन अंतर्गत 11, गांधीबाग झोन अंतर्गत 16, सतरंजीपूरा झोन अंतर्गत 14, लकडगंज झोन अंतर्गत 12, आशीनगर झोन अंतर्गत 21, मंगळवारी झोन अंतर्गत 108 आणि मनपा मुख्यालयात ३ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. 500 रुपये प्रमाणे आतापर्यंत 11313 बेजबाबदार नागरिकांकडून रु 56 लक्ष 55 हजार 500 वसूल करण्यात आले आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleसरदार पटेल युवक मंडल के किया डीसीपी नुरुल हसन का सत्कार
Next articleआली दिवाळी : शिक्षक व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून सुट्टी मिळणार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).