Home हिंदी कोविड-19 : कर्तव्यावर प्राण गमावणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांना मदत

कोविड-19 : कर्तव्यावर प्राण गमावणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांना मदत

499

नागपूर ब्यूरो : कोविडविरुद्धच्या लढाईत कर्तव्य बजावताना प्राण गमावणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाखांचे शासकीय अनुदान सरकारतर्फे देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

त्यासंबंधीच्या कागदपत्राची पूर्तता करून नागपूर पोलीस आयुक्तालयाने चार पोलिसांच्या कुटुंबीयांचे सानुग्रह अनुदान मुंबई कार्यालयातून मंजूर करून घेतले. त्याच्या धनादेशाचे वितरण पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते गुरुवार (29 आॅक्टोबर) ला पोलीस जिमखान्यात पार पडले. या कार्यक्रमा दरम्यान पोलीस आयुक्तांनी गीता सुरेश पाल, रंजना प्रकाश पाटील, साक्षी रवींद्र दमाहे आणि शीतल प्रवीण सुरकार यांना मदतीचे वाटप केले.

यावेळी गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त संदीप पखाले, गजानन शिवलिंग राजमाने प्रामुख्याने उपस्थित होते. कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाºयांमध्ये हवालदार सुरेश रमेश पाल (पारडी पोलीस स्टेशन), प्रकाश संतोषराव पाटील (शांतीनगर), रवींद्र बारिकदास दमाहे (सक्करदरा) आणि प्रवीण साहेबराव सुरकार (सक्करदरा) यांचा समावेश आहे.

Previous article…और नदी के पानी में शीर्षासन करने लगे डॉ. प्रकाश आमटे
Next articleपैगंबर हजरत मोहम्मद के जन्मदिवस के मौके पर पढ़ें उनके ये पवित्र संदेश
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).