Home हिंदी भुवनेश्वरी एस यांनी स्मार्ट सिटीचा पदभार स्वीकारला

भुवनेश्वरी एस यांनी स्मार्ट सिटीचा पदभार स्वीकारला

668

नागपूर ब्यूरो :  नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार श्रीमती भुवनेश्वरी एस यांनी बुधवारी सकाळी स्वीकारला.  प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री महेश मोरोणे यांनी त्यांचे तुळसी चे रोपटे देऊन स्वागत केले. त्यानंतर श्रीमती भुवनेश्वरी यांनी मनपा आयुक्त श्री राधाकृष्णन बी यांची भेट घेतली.

श्रीमती भुवनेश्वरी एस या मूळ तामिळनाडू च्या रहिवासी असून वर्ष 2015 च्या तुकडीच्या महाराष्ट्र कॅडरमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेच्या ( IAS) अधिकारी आहेत. या पूर्वी त्या भंडारा व नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी त्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या प्रथम आय ए एस अधिकारी आहेत. या पूर्वी शासना कडून डॉ रामनाथ सोनावणे यांची सी.ई.ओ. पदी  नियुक्ती करण्यात आली होती. या वर्षी फेब्रुवारी मध्ये त्यांची महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरण मध्ये सचिव पदावर नियुक्ती झाली होती तेव्हा पासून  हे पद रिक्त होते. त्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांचेकडे सीइओ पदाचा प्रभार सोपविण्यात आला होता.

श्रीमती भुवनेश्वरी यांचे स्वागत मुख्य वित्त अधिकारी नेहा झा, महाप्रबंधक राजेश दुफारे, डॉ.शील घुले, राहुल पांडे, अधि. मनजीत नेवारे, डॉ. प्रणिता उमरेडकर, मनीष सोनी, अमित शिरपुरकर, अमृता देशकर, सोनाली गेडाम, पराग अर्मल, अनूप लाहोटी, आरती चौधरी यांनी केले.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleसिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनला सर्वोच्च `प्लॅटिनम’ दर्जा
Next articleNagpur : चीफ जस्टिस शरद बोबडे आज से उपराजधानी में
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).