Home हिंदी सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनला सर्वोच्च `प्लॅटिनम’ दर्जा

सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनला सर्वोच्च `प्लॅटिनम’ दर्जा

660

13 मेट्रो स्टेशनला आयजीबीसीचा सर्वोच्च `प्लॅटिनम’ दर्जा बहाल

नागपूर ब्यूरो : गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे टप्पे गाठणाऱ्या महा मेट्रो नागपूरने आणखी एक मजल मारली आहे. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या पूर्व – पश्चिम उत्तर दक्षिण मार्गिकेच्या केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) संस्थेतर्फे प्लॅटिनम श्रेणी हा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला आहे.

सिताबर्डी इंटरचेंज निर्माण करताना याच्या संकल्पनेत आणि बांधकामात पर्यावरण संवर्धंनासंबंधी अनेक महत्वाचे पैलू अंगीकृत केल्याने या इमारतीला हा दर्जा प्राप्त झाला आहे. अत्याधुनिक सुविधांनी युक्त ‘एल’ आकाराचे सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन पाच मजली जंक्शन असून पहिल्या मजल्यावर तिकीट काउंटर,दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर मेट्रो गाड्यांसाठी प्लॅटफार्म व्यवस्था आहे. तसेच या ठिकाणी ऑपरेशन सेंटर असून या ठिकाणावरून गाड्यांचे नियंत्रण होते. या ठिकाणाहून सध्या स्थितीत पश्चिम आणि दक्षिण दिशेने मेट्रो जात असून लवकरच पूर्व आणि उत्तर दिशेने मेट्रोचा प्रवास नागरिकांकरिता उपलब्ध होईल.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).