Home हिंदी लाखनी येथे फटाका दुकानाला लागलेल्या आगीत 11 लाखांचे नुकसान

लाखनी येथे फटाका दुकानाला लागलेल्या आगीत 11 लाखांचे नुकसान

496

भंडारा ब्यूरो : भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे 26 आॅक्टोबर च्या मध्यरात्री फटाक्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत सुमारे 11 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या आगीत फटाका दुकानासह लगतचे कापड व फुलाचे दुकानही भस्मसात झाले.

लाखनी येथे सिंधी लाईनमध्ये अंबिका फटाका सेंटर आहे. दिवाळीनिमित्त या दुकानात फटाक्यांचा मोठा स्टॉक ठेवण्यात आला होता. सोमवारी रात्री दुकान नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास अचानक फटाक्यांचा आवाज येवू लागला. नागरिकांनी धाव घेतली असता फटाक्याच्या दुकानाला आग लागल्याचे दिसून आले.

नागरिकांनी तत्काळ एका बांधकाम कंपनीचे पाण्याचे टँकर आणून आग विझविली. मात्र तोपर्यंत दुकान जळून खाक झाले होते. यात 2 लाखांचे नुकसान झाले, तर लगतचे नागराज कोठेकर यांचे फुलांचे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले, त्यात त्यांचे 7 लाखांचे तर लक्ष्मी कापड दुकानाचे 2 लाखाचे असे एकूण 11 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


 

Previous articleजीएनएम नर्सिंग पाठ्यक्रम नहीं होगा बंद, सालवे की कोशिश रंग लाई
Next articleनितीन गड़करींचा राग अनावर होतो तेव्हा….
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).