Home हिंदी महा मेट्रो तर्फे मेट्रो स्थानकांवर प्रदर्शन लावण्याची सोय

महा मेट्रो तर्फे मेट्रो स्थानकांवर प्रदर्शन लावण्याची सोय

538

नागपूर : महा मेट्रो तर्फे एक्वा आणि ऑरेंज मार्गिकेवर प्रवासी सेवा सुरु झाल्यावर या निमित्ताने आता प्रवासी संख्या वाढवण्याकरता विविध कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. याच अंतर्गत महा मेट्रो नागपूर तर्फे स्टेशन परिसरातील जागेवर प्रदर्शन सुरु करण्यात आले आहेत. सुभाष नगर मेट्रो स्टेशन आणि सीताबर्डी इंटरचेंज येथे या संदर्भात क्रमशः जुन्या वस्तूंचे आणि पुस्तकांचे प्रदर्शन सुरु झाले. या दोन्हीही प्रदर्शनाकरता मेट्रो तर्फे जागा आणि विजेची सोय करण्यात आली होती.

याच शृंखलेत आता सुभाष नगर आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथे विविध उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन सुरु करण्यात आले आहेत. या सर्व उपक्रमाला नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला असून या संदर्भात नागपूरकरांनी मेट्रो स्थानकाच्या परिसरात प्रदर्शन स्थापन करण्याकरता महा मेट्रोच्या दीक्षा भूमी समोरील प्रशासकीय इमारतीच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मेट्रो स्थानकाच्या परिसरात, इमारतीत या प्रकारचे प्रदर्शन स्थापन करणे शक्य असून महत्वाचे म्हणजे महा मेट्रो तर्फे ही सोय निशुल्क होत आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleसिंधी समाज ने किया डीसीपी लोहित मतानी का स्वागत
Next articleकोव्हिड लसीसाठी मनपा करणार आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटाबेस तयार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).