Home हिंदी कोव्हिड लसीसाठी मनपा करणार आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटाबेस तयार

कोव्हिड लसीसाठी मनपा करणार आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटाबेस तयार

697

केंद्र आणि राज्य शासनाकडून दिशानिर्देश जारी : शासकीय आणि खाजगी रुग्णालयातून घेणार माहिती

नागपूर ब्यूरो : केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून कोव्हिड-19 वर नियंत्रण करण्यासाठी लस तयार करण्याबाबत वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. कोव्हिडची लस तयार झाल्यानंतर सर्वप्रथम आरोग्य सेवक, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना देण्यासाठी त्यांची संपूर्ण माहिती घेउन त्याचा डेटाबेस तयार करण्याचे कार्य नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. शासनाच्या आदेशानुसार मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सुद्धा शहरातील सर्वच रुग्णालय, इस्पितळे, दवाखान्यांना माहिती देण्यासाठी पत्र दिले आहे.

यासंबंधी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, नागपुरातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयांची माहिती केंद्र आणि राज्य सरकारला संकलीत करून सादर करायची आहे. ही माहिती लवकरात लवकर शासनाकडे पाठवायचे असून सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे सेवा देत असलेले आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती महानगरपालिकेद्वारे विहीत नमून्यात सादर करावी.

यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल, सामुदायिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुष रुग्णालये, महानगरपालिकेचे दवाखाने, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, खाजगी कॉर्पोरेट हॉस्पिटल, खाजगी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नर्सिंग होम यांच्यासह शहरातील सर्वच नोंदणीकृत व अन्य रुग्णालयांनी सुद्धा आपली माहिती सादर करणे अनिवार्य आहे. यासंबंधी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शहरातील सर्वच रुग्णालय, इस्पितळे, दवाखान्यांना पत्र दिले आहे. त्यानुसार सर्व रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय व्यावसायिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती homnmc.ngp@gmail.com या मेलवर बुधवारी 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता पर्यंत सादर करावी.

विशेष म्हणजे माहिती पाठविताना रुग्णालयांना ‘डाटा कलेक्शन टेम्प्लेट’नुसार माहिती तयार करावी लागणार आहे. उदा.COVIDVACC_IMPORTBENEFICIARIES_STATE_UT_NAGPUR_NAGPURCOPORATION_HOSPITALNAME.XLSX अशी लिंक तयार करून माहिती तयार करावी. यासंबंधी नोडल अधिकारी म्हणून डॉ.प्रवीण गंटावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णालयांना माहिती पाठविताना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होत असल्यास त्यांनी नोडल अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleमहा मेट्रो तर्फे मेट्रो स्थानकांवर प्रदर्शन लावण्याची सोय
Next articleसातत्यपूर्ण समर्पीत सेवेचा सन्मान हा गौरवाचा क्षण : महापौर संदीप जोशी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).