Home हिंदी ऑटो रिक्षा मेट्रो फिडर सर्विस म्हणून कार्य करणार

ऑटो रिक्षा मेट्रो फिडर सर्विस म्हणून कार्य करणार

786

मेट्रो-ऑटो संघटना बैठकीत मोबाईल ंंअ‍ॅपचे अनावरण

नागपूर ब्यूरो : कोरोनाच्या संक्रमणामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली मेट्रो सेवा पुन्हा सुरु झाली असून हळू -हळु मेट्रो प्रवासी याचा वापर करीत आहे. महा मेट्रोने तिकीट दरात 50% सूट दिली असून प्रवासी या सेवेचा वापर करीत आहे. मेट्रोचा वापर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात करण्यात यावा याच पार्श्वभूमीवर मेट्रो भवन येथे आज टायगर ऑटो चालक संघटने सोबत संवाद साधण्यात आला.

महा मेट्रोच्या वतीने विस्तृत प्रस्तुतीकरण करत मेट्रो सेवा सोबत ऑटो सेवेचा वापर नागरिक कश्या प्रकारे करू शकतील हे सांगण्यात आले. टायगर ऑटो संघटनाचे अध्यक्ष विलास भालेकर यावेळी उपस्थित होते. येत्या काळात सुमारे 2000 ऑटो रिक्षा चालकांचा या मोहिमेशी जोडण्याचा दोघांचा मानस आहे.

सध्या 16 मेट्रो स्थानकांवरून (ऑरेंज आणि एक्वा लाईन) प्रवासी सेवा सुरु आहे या मेट्रो स्थानकांवर प्रत्येक मेट्रो स्टेशन येथे ऑटो चालक संघटनेमधील एक ऑटो चालक मेट्रो मित्र म्हणून कार्य करेल जो मेट्रो आणि ऑटो संघटनेशी समन्वय साधून मधला दुवा ठरेल. महा मेट्रोने नवीन उदयोनमुख कंपनी भारत राईड्स सोबत सामंजस्य करार (एमओयु) केला आहे.

यामुळे ऑटो चालकांना जास्तीत जास्त प्रवासी मिळतील. सदर अ‍ॅप पूर्णपणे नि:शुल्क असून या करता ऑटो चालक तसेच प्रवाश्याना कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नाही. या माध्यमाने जवळ असलेले स्वच्छता गृह, औषधाची दुकाने, खानावळ, मेट्रो स्टेशन, बस स्थानक, पर्यटन स्थळासंबंधी देखील माहिती मिळवू शकतो. याप्रसंगी टायगर ऑटो संघटनाचे अध्यक्ष विलास भालेकर म्हणाले की यामुळे ऑटो चालक मेट्रोशी जुडल्याने दोघांना फायदेशीर ठरणार आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).