Home हिंदी कंपन नियंत्रित करण्यासाठी झिरो माईल स्टेशनवर फ्लोटिंग ट्रॅक स्लॅब

कंपन नियंत्रित करण्यासाठी झिरो माईल स्टेशनवर फ्लोटिंग ट्रॅक स्लॅब

707

कोणत्याही मेट्रो प्रकल्पात अश्या प्रकारची प्रक्रीया पहिल्यांदा कार्यान्वित

नागपूर ब्यूरो : महा मेट्रो, नागपूर द्वारे झिरो माईल मेट्रो स्टेशन येथे अनोखे मास स्प्रिंग सिस्टम (एमएसएस) बसविण्यात आले आहे. सदर मास स्प्रिंग सिस्टम हे मेट्रो रेल्वे गाडीच्या हालचाली मुळे उध्दभवणारे कंपन थांबवते. वायाडक्ट येथे अश्या प्रकारचे फ्लोटिंग ट्रॅक स्लॅबवर यंत्रणा बसविणारे नागपूर प्रकल्प पहिला मेट्रो प्रकल्प आहे. सदर एमएसएस प्रणाली हे कंपन मोठ्या प्रमाणात कमी करत मेट्रो इमारतीचे कंपन कमी करण्यास मदत करते.

झिरो माईल मेट्रो स्टेशन येथे इमारतीच्या आतमधून मेट्रो ट्रॅक असल्यामुळे रेल्वे ट्रॅक आत टाकण्यात आले आहे मेट्रो रेल्वेच्या रुळामुळे उद्भवणारे कंपन थेट इमारती मध्ये भासू शकतात. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पा तील इतर मेट्रो स्थानकांवर ट्रॅक आणि स्टेशन हे वेगवेगळ्या मजल्यावर आहे म्हणून तिथे या व्यवस्थेची गरज नाही.

मेट्रो स्टेशन वरील ट्रॅक स्ट्रक्चर ची रचना खास फ्लोटिंग स्लॅब (स्टेशन स्लॅबच्या वरील 30 मी .मी.) प्रमाणे करण्यात आली आहे ज्याला एकूण 176 क्रोम अलॉयड स्टील स्प्रिंग सिस्टम आयसोलेटर्स स्थिरता प्रदान करते तसेच 135 मीटर लांबीचे ट्रॅक स्लॅब संपूर्ण प्लॅटफार्म वरील अप आणि डाऊन लाईनला स्थिरता प्रदान करते व या ठिकाणी काँक्रीटचे संपूर्ण स्लॅब संलग्न असून यामध्ये कुठल्याही प्रकारचे जॉइंट नाही.

क्रोम अलॉयड स्टील स्प्रिंग सिस्टम ट्रेन च्या हालचाली दरम्यान तयार होणारी कंपन कमी करते. मास स्प्रिंग सिस्टम हे एका प्रकारे मेंटेनन्स फ्री सिस्टम असून याचे डिझाईन 75 वर्षां पर्यंत करण्यात आले आहे. झिरो माईल स्टेशन बहु-मजली वाणिज्यिक इमारत असून याठिकाणी अंडरग्राउंड येथे मल्टी लेवल पार्किंगची व्यवस्था करण्यात आली तसेच प्लॅटफार्मच्या खाली कॉनकोर्सची व्यवस्था असणार आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleभारतीय उच्चायोग लंदन में चयनित होने पर नंदिता का सत्कार
Next articleनागपूर : लकडगंज झोन होणार टँकरमुक्त
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).