Home हिंदी नागपूर : लकडगंज झोन होणार टँकरमुक्त

नागपूर : लकडगंज झोन होणार टँकरमुक्त

737

जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांची माहिती

नागपूर ब्यूरो : अमृत योजनेंतर्गत नागपूर शहरात सर्वच झोनमध्ये काम सुरू आहे. यामध्ये लकडगंज झोनचे कार्य जवळपास पूर्णत्वास आले असून लवकरच लकडगंज झोन टँकरमुक्त होईल. याशिवाय मोठ्या इमारतींच्या सोसायटीमध्ये पाणी पुरवठ्यासंबंधी येणा-या तक्रारीवर उपाय म्हणून अशा ‘बल्क कन्झूमर्स’ना स्वतंत्र नळ कनेक्शन देण्यात येणार आहे. यासाठी इमारतीच्या परिसरात पाण्याच्या टाकीसाठी जागा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे, अशी माहिती मनपाचे जलप्रदाय तथा स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिली.

विविध विषयांच्या अनुषंगाने मंगळवारी (ता.13) जलप्रदाय समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत जलप्रदाय तथा स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, समितीचे सदस्य जुल्फेकार भुट्टो, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, ओसीडब्लू चे संजय रॉय, के.एम.पी.सिंग, राजेश कालरा यांच्या उपस्थितीसह व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून समितीचे अन्य सदस्य व डेलिगेट्स जुळले होते.

बैठकीत जलप्रदाय तथा स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी अमृत पाणी पुरवठा योजना, 2477 पाणी पुरवठा योजना, पाणी पट्टी वसूली आदी विषयांचा आढावा घेतला. अमृत योजनेंतर्गंत नागपूर शहरामध्ये 377 किमी चे काम प्रस्तावित आहे. यामध्ये संपूर्ण शहरात 42 टाक्या आणि एक जीएसआर बनविणे अपेक्षित असून याचे काम सुरू आहे. अमृत योजनेच्या कामामध्ये लकडगंज झोनचे कार्य आघाडीवर असून लवकरच झोन टँकरमुक्त होणार आहे. अमृत योजनेमुळे लकडगंज झोनमध्ये 35 टँकर आणि त्यांच्या 300 फे-या कमी होणार आहेत. येत्या 1 नोव्हेंबरपासून झोनच्या या फे-या बंद करण्यात येणार असून झोन टँकरमुक्त केले जाईल, अशी घोषणा यावेळी जलप्रदाय तथा स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी केली.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleकंपन नियंत्रित करण्यासाठी झिरो माईल स्टेशनवर फ्लोटिंग ट्रॅक स्लॅब
Next articleकोव्हिड संवाद : मुलांबरोबर ‘क्वालिटी टाईम’ घालवा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).