Home हिंदी अभिनेत्री सई लोकूरचा साखरपुडा, लवकरच विवाहबंधनात अडकणार

अभिनेत्री सई लोकूरचा साखरपुडा, लवकरच विवाहबंधनात अडकणार

बिग बॉसच्या पहिल्या सीझनमधून सगळ्यांच्या घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री सई लोकूरचा साखरपुडा सोहळा पार पडला. या सोहळ्याचे फोटो स्वतः सईने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/tv/CF3f7VkJ-AI/?utm_source=ig_web_copy_link

आपल्या लग्नाची बातमी काही दिवसांपूर्वी सईने सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर केली होती. सईने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला होता. मात्र या फोटोत सई आणि तिचा जोडीदार दोघेही पाठमोरे उभे होते. सईने पाठमोरा फोटो शेअर केल्यापासूनच तिचा जोडीदार कोण आहे, यासंदर्भात चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत होती. अखेर सईच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले असून तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव तीर्थदीप रॉय असं आहे.

https://www.instagram.com/p/CFyq7KSJlmc/?utm_source=ig_web_copy_link

सईने आधीच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे तिच्या होणाऱ्या नवऱ्याला सुंदर खळी आहे. म्हणूनच तिने #mydimpledguy असा हॅशटॅग वापरला होता. सई लोकूर ही मूळची बेळगावची. तिने काही मराठी सिनेमात काम केलं. पण तिची चर्चा झाली ती बिग बॉसमध्ये. बिग बॉसमध्ये मेघा धाडे, उषा नाडकर्णी, अनिल थत्ते, रेशम टिपणीस, राजेश शृंगारपुरे आदी मंडळी होती. यात सगळ्यात जास्त ग्लॅमर आपल्याकडे खेचलं ते सईने. (Photo Credit : @sai.lokur)


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here