Home हिंदी रातुम नागपूर विद्यापीठाची पदवी परीक्षा होणार एप्प द्वारे

रातुम नागपूर विद्यापीठाची पदवी परीक्षा होणार एप्प द्वारे

692
नागपुर ब्यूरो : पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राच्या परीक्षांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘आरटीएमएनयू परीक्षा’ या नावाचे एप्प आणले आहे. या द्वारेच विद्यार्थ्यांची ऑफलाइन एमसीक्यू परीक्षा होणार आहे. या द्वारे गैरप्रकारांवरही नजर ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी दिली आहे.

कुलगुरू म्हणाले, ‘सुरक्षेची हमी असणारे हे एप्प विद्यार्थ्यांना अत्यंत सोयीचे ठरणार आहे. या एप्प द्वारे निर्धारित वेळापत्रकाच्या दिवशी निर्धारित वस्तुनिष्ठ 50 प्रश्नांचा पेपर विद्यार्थ्यांना सोडवावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना 50 पैकी केवळ 25 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यात कोणतेही निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही. या एप्प वर विद्यार्थ्यांना लॉगइन आयडी व पासवर्ड देण्यात येणार आहे. त्याची नोंद हॉल तिकिटवर केली आहे. एप्प गूगल प्ले स्टोअरमधून डाउनलोड करावे लागणार आहे.’

जस्ट काळ इंटरनेट ची गरज नाही
या एप्प मध्ये लॉगइन झाल्यावर ओटीपीद्वारे विद्यार्थ्याची ओळख निश्चित करण्यात येईल. त्यानंतर त्याला ऑनलाइन परीक्षेचा एमसीक्यू पेपर डाउनलोड करावा लागेल. हा पेपर डाउनलोड करतानाच केवळ इंटरनेटची गरज पडेल. एकदा डाउनलोड झाल्यानंतर त्याच्याकडे इंटरनेट नसले तरीही एका तासात त्याला पेपर सोडवता येईल. पेपरला टायमर लावले आहे. त्यामुळे तितक्या वेळात त्याला पेपर सोडवून झाल्यावर सबमिट करावा लागेल. त्यावेळी इंटरनेट नसले तरीही पेपर झाल्यानंतर पुढील तीन तासांत त्याला कधीही तो सबमिट करता येईल.

दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळेल मदतनीस
अंतिम सत्राच्या परीक्षेत एकूण 56 दिव्यांग विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी विद्यापीठाने मदतनीस नियुक्त करण्याची सूचना केली आहे. त्यांना पूर्वीच्या नियमानुसार लेखनिक अथवा सहायक देण्यात येईल. त्याचीही ओळखपत्रे मागवण्यात आली आहेत. त्यामुळे एप्प वरून दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

आंदोलनाचा परीक्षांवर परिणाम होणार नाही
विद्यापीठाची परीक्षा ही पूर्णत: ऑनलाइन होत आहे. त्यात कर्मचाऱ्यांचा कोणताही सहभाग नाही. त्यामुळे 24 सप्टेंबरपासून कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या लेखणी बंद अथवा 1 तारखेपासूनच्या कामबंद आंदोलनाचा परीक्षांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे कुलगुरू डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला कुलसचिव नीरज खटी व परीक्षा संचालक प्रफुल्ल साबळे उपस्थित होते.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleनागपुर के जैन समाज ने किया जमाल सिद्दीकी का सत्कार
Next articleशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).