Home हिंदी नागपूर जिल्ह्यात दोन डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल उभारा

नागपूर जिल्ह्यात दोन डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल उभारा

957

ग्रामीण भागातील जनतेला कोरोना उपचारासाठी हवी सूट : खा. कृपाल तुमाने

नागपूर ब्यूरो : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची वाढणारी संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी 500 बेड असलेल्या दोन सुसज्ज हॉस्पिटलची निर्मिती करावी, यासोबतच ग्रामीण भागातून येणाऱ्या कोविड रुग्णांना उचारासाठी तत्काळ पैसे भरण्याची अट घालण्यात येऊ नये, यासाठी खासगी हॉस्पिटलला राज्य सरकारने सूचना द्याव्यात, अशी मागणी खा. कृपाल तुमाने यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केली.

विभागीय कार्यालयात आज शुक्रवारी गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, औषध व अन्न प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर जिल्ह्यातील कोरोना महामारी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. रामटेकचे शिवसेना खासदार श्री कृपाल तुमाने यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमोर कोविड-19 परिस्तिथी व ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या मांडल्या. खासदार कृपाल तुमाने म्हणाले, नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनावर नियंत्रण मिळवायचे असेल तर सर्वात आधी त्यांच्या उपचाराची सोय करून देणे महत्वाचे आहे. यासाठी ज्या प्रमाणे नागपूर महानगर पालिकेने कळमेश्वर नजीकच्या राधास्वामी सत्संग ब्यास 5000 बेडचे कोविड सेंटर निर्माण केले होते त्याच धर्तीवर त्याच ठिकाणी 500 बेडचे कोविड हॉस्पिटल निर्माण करावे, यामुळे नागपूर जिल्ह्यातील पश्चिम भागातील नागरिकांना फायदा होईल. तर नागपूर जिल्ह्यातील पूर्व भागातील नागरिकांसाठी रामटेक येथे अशाच हॉस्पिटलची निर्मिती करावी.

रामटेक लोकसभा मतदार संघाचे दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करणारे खा. तुमाने यांनी नागपूर शहरात उपचारासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील रुग्णांची अवस्था मांडताना सांगितले की, नागपूर शहरातील अनेक खासगी रुग्णालये उपचार करणे टाळत त्यांच्याकडून दोन ते अडीच लाख रुपये आधी जमा करण्यास सांगतात. मंत्री सुनील केदार यांनी वेकोलिचे रुग्णालये कोविड उपचारासाठी वापरण्यात यावे अशी मागणी केली, त्यास खा. कृपाल तुमाने यांनी दुजोरा देत, वेकोलिशी बोलून प्रयत्न करणार असल्याची कबुली दिली.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleदीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द
Next articleजनता कर्फ्यू 2.0 : नागपुर में दूसरे चरण के पहले दिन कैसा दिखा असर
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).