Home हिंदी दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द

दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द

879

स्मारक समितीची घोषणा, घरीच अभिवादन करण्याचे केले आवाहन

नागपूर ब्यूरो : नागपुर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी दीक्षाभूमीवर होणाºया धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने घेतला आहे. यंदा नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपापल्या घरीच अभिवादन करावे, असेही आवाहन समिति ने केले आहे.

स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांनी यासंदर्भात पत्रक जारी केले आहे. सध्या नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. विजयादशमीला दीक्षाभूमीवर कोट्यवधी लोकांची गर्दी होत असते. अशा परिस्थितीत कोरोनासंबंधीच्या सूचनांचे पालन करणे अशक्य आहे. गर्दीत एखादा कोरोनाबाधित आल्यास सर्व बांधवांचे आरोग्य धोक्यात घालण्यासारखे होईल. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे दीक्षाभूमीवर होणारे यावर्षीचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय स्मारक समितीने घेतला आहे.

सर्व नागरिकांनी येत्या 14 आॅक्टोबर व अशोक विजयादशमीला 25 आॅक्टोबर रोजी आपापल्या घरीच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन करावे, असे आवाहनही डॉ. फुलझेले यांनी केले आहे. दीक्षाभूमीवर यंदा दरवर्षीप्रमाणे कोणताही कार्यक्रम होणार नाही. त्यामुळे दुकानांनासुद्धा परवानगी देण्यात येणार नाही.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).