Home हिंदी देवेंद्र फडणवीस यांची प्लाज्मा डोनेट कँपला भेट, 18 लोकांनी दिले प्लाझ्मा

देवेंद्र फडणवीस यांची प्लाज्मा डोनेट कँपला भेट, 18 लोकांनी दिले प्लाझ्मा

670
0

आ.कृष्णा खोपडे यांचे नेतृत्वात पूर्व नागपूर भाजप चा अभिनव उपक्रम

नागपूर : संपूर्ण महाराष्ट्रात भाजप चा प्रत्येक कार्यकर्ता लॉकडाऊन च्या काळापासून ते आजही कोरोनाशी लढा देत आहे. त्यात अनेक कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण देखील झाली. परंतु कोरोनामुक्त होताच पुन्हा आपण काय करू शकतो? हीच भावना मनाशी घेऊन ते प्लामा डोनेट करीत आहे. अगदी कम्युनिटी किचन, किटवाटप पासून ते प्लाज्मा डोनेट पर्यंत अत्यंत चिकाटीने लढा देणारा जर कोणी असेल तर तो भाजप चा कार्यकर्ता आहे. आणि म्हणूनच मला माझ्या पक्षाचा अभिमान वाटतो. असे उदगार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

ते पूर्व नागपूर भाजप व्दारे आमदार कृष्णा खोपडे यांचे नेतृत्वात आयोजीत लाईफलाईन ब्लड बँक येथे प्लाज्मा डोनेट कँपच्या भेटीदरम्यान बोलत होते. पूर्व पालकमंत्री, प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.कृष्णा खोपडे व अनिल सोले देखील त्यांचे सोबत होते.

आ. कृष्णा खोपडे यांनी सांगितले की, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लाईफलाईन ब्लड बँक, रामदासपेठ येथे सदिच्छा भेट देऊन प्लाझ्मा डोनेट करणा-या भाजयुमो कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. 70 कोरोनामुक्त कार्यकर्ते व नागरिकांची रक्ततपासणी केली असता त्यात 18 व्यक्ती प्लाज्मा डोनेट करण्यास पात्र ठरले. म्हणजे किमान 36 कोविड रुग्णाचे प्राण वाचविण्याची सोय या माध्यमातून झालेली आहे. ही नेमकी शुरुवात जरी असली, तरी नागपूर शहरात अशा प्रकारचे आयोजन झाल्यास शेकडो रुग्णाचे प्राण वाचविण्यास नक्कीच मदत मिळेल.

प्रत्येक कोरोनामुक्त व्यक्तीने स्वत: समोर येऊन प्लाज्मा डोनेशन साठी जवळच्या ब्लडबँक मध्ये जाऊन रक्त तपासणी करावी, असे आवाहन खोपडे यांनी केले आहे. कार्यक्रमात लाईफलाईन ब्लड बँकचे डॉ.हरीश वरभे, प्रविण साठवणे, मंडळ अध्यक्ष संजय अवचट, महामंत्री राजू गोतमारे, सचिन करारे, सुनिल सूर्यवंशी, अनिल कोडापे, एजाज शेख व अन्य उपस्थित होते.

यांनी केले प्लाझ्मा डोनेट
प्लाज्मा डोनेट करण्याची तयारी दाखविणा-या भाजप कार्यकर्त्यांमध्ये राजू गोतमारे, सचिन करारे, प्रफुल्ल गणात्रा, श्रीकांत सायरे, चक्रधर अतकरे अजय मरघडे, निशांत पटेल, हेमंत बारापात्रे, गणेश कैकाडे, दिपक नळवाले, लोकेश ठाकरे, नरेंद्र बघेल, विलास चापले, यादराम गेंडरे, लक्ष्मण डोंगरे, संतोष गुप्ता, स्वराज आंबुलकर यांचा समावेश आहे.


रीडर्स आप आत्मनिर्भर खबर डॉट कॉम को ट्वीटर, इंस्टाग्राम और फेसबुक पर फॉलो कर रहे हैं ना? …. अबतक ज्वाइन नहीं किया है तो अभी क्लीक कीजिये (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020और पाते रहिये हमारे अपडेट्स.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here