Home Maharashtra #Nagpur l नागपूरमध्ये हातमाग कपड्यांचे भव्य प्रदर्शन ‘हथकरघा-2025’

#Nagpur l नागपूरमध्ये हातमाग कपड्यांचे भव्य प्रदर्शन ‘हथकरघा-2025’

128

नागपूर ब्युरो : दिवाळी निमित्त नागपूरमध्ये हातमाग कपड्यांचा भव्य ‘स्टेट हॅण्डलूम एक्स्पो – हथकरघा 2025’ भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवार, दि. 6 ऑक्टोबर 2025 रोजी सायं. 5.30 वाजता कुसुमताई वानखेडे सभागृह, उत्तर अंबाझरी रोड, धरमपेठ, नागपूर येथे होणार आहे.

उद्घाटन मा. श्री. संजय देणे, भा.प्र.से., आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या हस्ते होणार असून विविध मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या एक्स्पोमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यांतील हातमाग सहकारी संस्था सहभागी होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना निरनिराळ्या प्रकारचे उच्च दर्जाचे हातमाग कापड एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.

या प्रदर्शनीचे प्रमुख उद्दिष्टे म्हणजे –

– हातमाग उत्पादित कापडाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे.

– ग्रामीण विणकरांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविणे.

– हातमाग क्षेत्रातील वैशिष्टयपूर्ण डिझाईन्सची ओळख करून देणे.

– नव्या डिझाईन्स व त्यांच्या बाजारपेठेची चाचणी करणे.

हातमागावर विणलेले कापड परंपरेची ओळख व वैभवशाली दर्जा जपणारे असल्याने या प्रदर्शनामुळे विणकरांना प्रोत्साहन मिळणार आहे तसेच ग्राहकांना थेट खरेदीची सुवर्णसंधी मिळणार आहे.

प्रदर्शन 6 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2025 दरम्यान दररोज सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार असून, प्रवेश सर्वांसाठी मोफत असेल. आयोजकांनी नागपूरकरांना व परिसरातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.