नागपूर ब्युरो: नागपूर शहराचे पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांचे लिखित पुस्तक “Indian Society” याचे अनावरण नुकतेच पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते पोलिस भवन, सिविल लाइन्स येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.

कार्यक्रमात पोलीस विभागाच्या उच्च अधिकारी व नागरिक उपस्थित होते. पुस्तकात भारतीय समाजाचे विविध पैलू आणि सामाजिक संरचनेवरील अभ्यास मांडण्यात आला आहे, ज्यामुळे नागरिकांना समाजाचे सखोल ज्ञान मिळेल. अनावरणानंतर उपस्थितांनी लेखकाचे कौतुक केले आणि पुस्तकाबद्दल माहिती घेतली.





















