Home Nagpur #Maha_Metro l मेट्रोचे महा कार्ड आता सोपे, किमान बॅलेंस फक्त 25 रुपये

#Maha_Metro l मेट्रोचे महा कार्ड आता सोपे, किमान बॅलेंस फक्त 25 रुपये

नागपूर ब्युरो : नागपूर मेट्रो रेल प्रकल्पांतर्गत प्रवाशांच्या सोयीसाठी महा मेट्रोने राबविलेली महाकार्ड प्रक्रिया आता सुलभ झाली आहे. महा कार्ड करता मिनिमम बॅलेंस आता ४१ रुपयांवरून २५ रुपये करण्यात आले आहे. किमान शिल्लक रकमेत 16 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मेट्रो ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी महा कार्डचा अधिक वापर केला जात आहे. विद्यार्थी,नोकरदार आणि व्यापारी वर्ग नियमित पणे महा कार्डचा उपयोग करीत आहे. महाकार्डच्या माध्यमातून मेट्रोच्या भाड्यात १० टक्के सूट त्याचप्रमाणे कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांसाठी मेट्रो स्थानकांवरून दररोज १०० रुपये दराने पासची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

तीन दिवसीय फॅशन डिझाईन प्रशिक्षण नोंदणी अर्ज👇
https://docs.google.com/forms/d/1sEgbHQx6wGJg2m7ex7Awr7C5crjxO0j3iEC90r7A710/edit

या शिवाय, महा मेट्रो शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांना भाड्यात 30 % सूट देत आहे. शाळा, महाविद्यालय किंवा शैक्षणिक संस्थेचे ओळखपत्र आणि आधार कार्डाच्या आधारे विद्यार्थ्यांना तिकिटावर सवलत मिळू शकते. विद्यार्थ्यांना मेट्रो ट्रेनमध्ये सायकल सोबत घेऊन प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अनेक विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेत आहेत.

शनिवार आणि रविवार ३०% डिस्काउंट

शनिवार-रविवार वीकेंडमध्ये कुटुंबासह मेट्रोने प्रवास करणाऱ्याची गर्दी बघता महा मेट्रोने वीकेंडच्या भाड्यात सवलत प्रदान केली आहे. मेट्रो तिकीटावर 30 टक्के सूट दिल्या गेली आहे. या सवलतीचा लाभ वीकेंडला कुटुंबासह मेट्रोने प्रवास करणाऱ्याची पसंती वाढत आहे! बाहेर गावावरून येणारे नातेवाईक, मित्रमंडळींना मेट्रोचा प्रवास प्रत्येक व्यक्तीला करावासा वाटतो. विकेंड डिस्काउंट ही संकल्पना प्रवाशांना या दोन दिवसांत खरेदी, फिरण्याकरिता आणि इतर कारणांसाठी खूप कमी किमतीत प्रवास करता यावा यासाठी सुरू करण्यात आली आहे. वाढते तापमान बघता मेट्रो वातानुकूलित गाड्यांमध्ये आरामदायी प्रवास प्रदान करते जे कि प्रवाशांसाठी फायदेशीर ठरेल.