Home Nagpur #Maha_Metro l मेट्रो मध्ये उद्योजकांची परिषद

#Maha_Metro l मेट्रो मध्ये उद्योजकांची परिषद

148 लहान-मोठ्या दुकानांची माहिती दिली

नागपूर ब्युरो : मेट्रो स्थानकांवर उपलब्ध असलेली छोटी-मोठी दुकाने आणि कार्यालयासाठी उपलब्ध असलेल्या जागेची माहिती देण्याच्या उद्देशाने महा मेट्रोच्या मेट्रो भवन येथे आयोजित कार्यक्रमात सर्व श्रेणीतील व्यावसायिकांची परिषद घेण्यात आली. प्रारंभी मेट्रो अधिकाऱ्यांनी दुकाने वाटपाशी संबंधित निविदा आणि लिफाफा पद्धतीची सविस्तर माहिती देण्यात आली. व्यापाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची त्यांना उत्तरे देण्यात आली.महा मेट्रोचे प्रॉपर्टी डेव्हलपमेंटचे महाव्यवस्थापक श्री. संदीप बापट यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, सध्या मेट्रो स्थानकावर 148 लहान-मोठी दुकाने तसेच कार्यालय 9 ते 15 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर उपलब्ध आहे.निविदा प्रक्रिया अत्यंत सोपी असल्याने कोणताही व्यावसायिक सहजपणे दुकाने घेऊ शकतो. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून आवश्यकता पडल्यास महा मेट्रोच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केल्या जाते.

तीन दिवसीय फॅशन डिझाईन प्रशिक्षण नोंदणी अर्ज👇
https://docs.google.com/forms/d/1sEgbHQx6wGJg2m7ex7Awr7C5crjxO0j3iEC90r7A710/edit

विविध व्यवसायाच्या संधी
श्री. बापट यांनी सांगितले की, सध्या 108 लहान आणि 40 मोठ्या दुकानांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. 1 निविदा फॉर्मवर कितीही दुकाना करता आवेदन केल्या जाऊ शकते. छोट्या दुकानांचा भाडेपट्टा कालावधी 9 वर्षे आणि मोठ्या दुकानांचा 15 वर्षांसाठी ठेवण्यात आला आहे. निविदा पूर्ण करण्यासाठी सीए टर्नओव्हर प्रमाणपत्र किंवा 3 वर्षांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.याशिवाय गुमास्ता, पॅन कार्ड, जीएसटी क्रमांक असणे आवश्यक आहे. ऑनलाइन प्रक्रिये व्यतिरिक्त, लिफाफा बंद करण्याची पद्धत देखील स्वीकारली जाते . 7410004321 या मोबाईल क्रमांकावरून सविस्तर माहिती मिळू शकते. मोबाइलवर संपर्क साधल्यानंतर कार्यालयाकडून निविदा काढताना दुकानांची माहिती मोबाइलवर पाठवली जाते.

२.४५ लाख चौरस फूट जागा उपलब्ध

महा मेट्रोच्या चारही मार्गांवर एकूण 38 मेट्रो स्थानके आहेत. बहुतेक स्थानकांवर दुकानांसाठी जागा उपलब्ध आहे. एकूण 2.45 लाख चौरस फूट जागा या ठिकाणी उपलब्ध आहे. लहान दुकानांसाठी 1000 चौरस फूट जागा उपलब्ध आहे आणि त्याहून अधिक मोठी दुकाने आणि कार्यालयांसाठी उपलब्ध आहे. श्री. बापट यांनी सांगितले कि, गेल्या वेळी ६० दुकानांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या, त्यापैकी २५ दुकानांचे वाटप करण्यात आले होते.निविदा उघडण्याच्या तारखेच्या 2 दिवस आधी सूचना दिली जाते आणि निविदा पारदर्शक पद्धतीने उघडल्या जातात. जयप्रकाश नगर, प्रजापती नगर, छत्रपती चौक, स्टेशन येथे सुमारे 26,000 चौरस फूट जागा उपलब्ध आहे. छोटी दुकाने वाटप केल्यावर बांधकामासाठी एक महिन्याचा अवधी दिला जातो.नियमानुसार बंदी असलेल्या गोष्टी वगळता व्यवसाय याठिकाणी करता येतो. जर दुकान चालू नसेल तर ते दुकान दुसऱ्याला देता येईल परंतु संपूर्ण जबाबदारी आधी व्यावसायिकाची राहील. ज्वलनशील पदार्थांवर याठिकाणी बंदी आहे.

विविध व्यवसाय संधी
व्यावसायिकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे श्री.बापट यांनी दिली. मेट्रो मध्ये व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ट्रेन रॅपिंगमध्ये जाहिरातीसाठी 2800 चौरस फूट जागा उपलब्ध आहे. याशिवाय रोड डिव्हायडर, व्हिडीओ वॉल स्टेशनवरही जाहिरात प्रदर्शनाची तरतूद करण्यात आली आहे. ट्रेनच्या डब्यात लावण्यात आलेल्या डिस्प्लेवरही जाहिराती दिल्या जाऊ शकतात. एका प्रश्नाच्या उत्तरात श्री.बापट यांनी 9 आणि 15 वर्षांच्या लीजनंतर निविदा पुनः काढण्यात येणार असल्याचे बापट यांनी सांगितले. निविदा रकमेच्या आधारे समान दुकान वाटप करण्यासाठी दुकानदाराला प्राधान्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे. परिषदेत उपस्थित व्यावसायिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दुकानांबाबतचा दृष्टिकोन व्यक्त केला.

Previous article#Kolhapur | स्पेशल हॅण्डलूम एक्सपो 2023 चे कोल्हापूर शहरात मोठ्या उत्साहात उद्घाटन
Next article#Maha_Metro l मेट्रोचे महा कार्ड आता सोपे, किमान बॅलेंस फक्त 25 रुपये
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).