Home मराठी उद्धव ठाकरेंची टीका | महाराष्ट्रावरील खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट...

उद्धव ठाकरेंची टीका | महाराष्ट्रावरील खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच

464
कामाख्या देवीचे दर्शन घेऊन शिंदे गट गुवाहाटीहून परतताच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. कामाख्या देवी खंजीर खुपश्या लोकांना बळ देणार नाही, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला आहे.

महाराष्ट्रातील जनतेची सर्व संकटे दूर व्हावीत, आनंद, सुख-समृद्धी मिळावी, असा नवस कामाख्या देवीच्या चरणी केल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे सांगतात, पण महाराष्ट्रावरील खरे संकट मुख्यमंत्री व त्यांचा गद्दार मिंधे गट हेच आहेत, असा टोला ठाकरेंनी लगावला आहे.

तसेच, हे संकट देवी लवकरात लवकर दूर करेल व महाराष्ट्राला सुखाचे, आनंदाचे, स्वाभिमानाचे दिवस आणेल याविषयी आमच्या मनात शंका नाही. देवी एकदम कडक आहे याची प्रचीती येईलच, असे ताशेरेही ठाकरेंनी ओढले आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून शिंदे गटावर टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत. यात ठाकरेंनी म्हटले आहे की, ठाकरेंनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात अनेक प्रश्नांचे थैमान सुरू आहे. राज्य आर्थिक डबघाईला आले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रातील सोलापूर व सांगलीतील ‘जत’वर दावा सांगून खळबळ उडवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर घाणेरडय़ा पद्धतीने चिखलफेक सुरू असल्याने राज्याची जनता संतप्त आहे. असे सगळे घडत असताना राज्याचे मिंधे मुख्यमंत्री त्यांच्या गटाच्या तीसेक आमदारांसह गुवाहाटी येथील कामाख्या देवीचा नवस फेडण्यासाठी गेले. मुंबईतून विमाने भरभरून माणसे नेली व तेथे नवस फेडले. पण दुसऱया दिवशी परत मुंबईकडे येताना त्यांच्या चेहऱ्यावरील तणाव आणि चिंता स्पष्ट दिसत होती.

ठाकरे म्हणाले, अशी आख्यायिका आहे की, कामाख्या देवीच्या मंदिरात ‘बळी’ प्रथा आहे व लहान रेड्यांचा बळी दिला जातो. (खरे खोटे 40 खोके आमदारांनाच माहीत) महाराष्ट्रात अनेक स्थानांवर कोंबडी, बकऱयांचा बळी दिला जातो व त्या अंधश्रद्धेस सगळय़ांचा विरोध आहे, पण शिवसेना फुटीनंतर महाराष्ट्रात सत्ता यावी म्हणून फुटीर गटाने असे बळी गुवाहाटीस जाऊन दिले हे खरे असेल तर महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेस ते शोभणारे नाही.

ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे की, कामाख्या देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रावरील सर्व संकटे दूर व्हावीत म्हणून प्रार्थना केली. म्हणजे मुख्यमंत्री मान्य करतात की, राज्यावर संकटे आहेत, पण ती दूर करण्यासाठी पंढरपूरची विठोबा माऊली आहे. आई भवानी, तुळजा देवी आहे, मुंबादेवी आहे. महाराष्ट्रात अनेक शक्तिपीठे असताना मुख्यमंत्री आसामातील रहस्यमय व गूढ जागेत जाऊन प्रार्थना करतात हे चित्र आझादीच्या अमृत महोत्सवात कधीच कोणी पाहिले नव्हते. मिंधे गटाचे आमदार म्हणतात, ‘देवीच्या दर्शनावरून खिल्ली उडवाल तर तुमच्यावर कोप होईल. देवीचा नवस फेडायला आम्ही आलोय’, मात्र हे साफ खोटे आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी नवस वगैरे करण्याचा या लोकांना अधिकार नाही.

ठाकरे म्हणाले, आषाढी-कार्तिकेस पांडुरंगाची महापूजा घातली जातेच व तेव्हा देवाला साकडे घातले जाते. कामाख्या देवीची पूजा ही वैयक्तिक असू शकेल. मिंधे गटाचे एक आमदार योगेश कदम देवीचे नाव घेऊन धमकी देतात की, ‘कामाख्या देवी कोपली तर तुमची खैर नाही. कोप होईल कोप.’ अर्थात हे सर्व मिंधे गटानेच लक्षात घ्यायचे आहे. कामाख्या देवीस न्याय देवता असेही म्हटले जाते. ‘बळी’ची लाच दिली म्हणून ती खंजीर खुपश्या लोकांना बळ देणार नाही. कोणतीही देवी किंवा देव गद्दार आणि भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत नाही. त्यामुळे कोप झालाच तर तो मिंधे गटाच्या आमदारांवर होईल. म्हणून धावत पळत हे लोक देवीच्या चरणाशी पोहोचले.

आसामच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक मुख्यमंत्री श्री. मिंधे यांनी केले. आसामात महाराष्ट्र भवन व महाराष्ट्रात आसाम भवन निर्माण करण्याबाबत ते बोलले. एकंदरीत पडद्यामागच्या हालचाली पाहता मुख्यमंत्री लवकरच माजी होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. त्यानंतर त्यांना त्यांच्या शिल्लक गटासह आसामातच राहावे लागेल. त्याची सोय ते जाता जाता करीत असावेत. त्यामुळे कामाख्या देवीच्या नावाने भलते-सलते उद्योग करू नका. खोके सरकार व आता रेडय़ांचे सरकार म्हणून आपण मशहूर झाला आहात हा देवीचाच कोप म्हणायला हवा.

Previous article#digitalmedia | डिजिटल मीडिया पत्रकाराचे दोन दिवसीय अधिवेशन
Next articleबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).